कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. आज (ता.१७) आणि उद्या (ता.१७) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पडणार आहे. तर विदर्भात काही प्रमाणात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.   सध्या गुजरातच्या दक्षिण भागात व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. अरबी समुद्राचा ईशान्य भागात चक्रवाताची स्थिती असून ते पाकिस्तानच्या दक्षिण भागातपर्यंत असून ती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या ईशान्य भाग ते मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग अशा दक्षिण उत्तर दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. येत्या रविवारी (ता.२०) बंगाल उपसागराच्या ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.   राज्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाच्या मेघगर्नजेसह सरी पडतील. शनिवारी (ता.१९) कोकण वगळता अनेक ठिकाणी उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल. रविवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. पुणे परिसरातही ढगाळ हवामान राहणार असून अधूनमधून हलका पाऊस पडेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com