agriculture news in Marathi rain possibility in Kokan and Marathwada Maharashtra | Agrowon

कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. आज (ता.१७) आणि उद्या (ता.१७) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पडणार आहे. तर विदर्भात काही प्रमाणात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  

सध्या गुजरातच्या दक्षिण भागात व परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. अरबी समुद्राचा ईशान्य भागात चक्रवाताची स्थिती असून ते पाकिस्तानच्या दक्षिण भागातपर्यंत असून ती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे.

तसेच उत्तर प्रदेशच्या ईशान्य भाग ते मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग अशा दक्षिण उत्तर दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. येत्या रविवारी (ता.२०) बंगाल उपसागराच्या ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.  

राज्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाच्या मेघगर्नजेसह सरी पडतील. शनिवारी (ता.१९) कोकण वगळता अनेक ठिकाणी उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल. रविवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. पुणे परिसरातही ढगाळ हवामान राहणार असून अधूनमधून हलका पाऊस पडेल.


इतर बातम्या
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...