agriculture news in Marathi, rain possibility in Kokan and Vidarbha, Maharashtra | Agrowon

कोकण, विदर्भात पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

पुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान यांमुळे उकाड्यात वाढ झाली आहे. तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर कोकणसह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पूर्व विदर्भातील अहेरी (जि. गडचिरोली) येथे सर्वाधिक १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मुलचेरा, गोंडपिंपरी प्रत्येकी ८० मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. आज (ता. २४) कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.    

पुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान यांमुळे उकाड्यात वाढ झाली आहे. तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर कोकणसह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पूर्व विदर्भातील अहेरी (जि. गडचिरोली) येथे सर्वाधिक १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मुलचेरा, गोंडपिंपरी प्रत्येकी ८० मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. आज (ता. २४) कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.    
मध्य भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा (मॉन्सून ट्रफ) पश्चिमेकडील भाग हिमालयाच्या पायथ्याकडे सरकलेल्या स्थितीत कायम आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, सोमवारपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. परिणामी, मध्य आणि पूर्व भारतात पाऊस सक्रीय राहणार आहे. राज्याच्या तापमानातही चढ-उतार सुरू असून, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.     

शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : दापोली ४०, रोहा, गुहागर, पालादपूर प्रत्येकी ३०, संगमेश्वर, भिरा, रत्नागिरी, जव्हार, अंबरनाथ, कल्याण, माथेरान, पेण, वैभववाडी, खेड, मुरूड, मोखेडा प्रत्येकी २०. 
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर ३०, ओझरखेडा, गिरणाधरण, लोणावळा, शाहूवाडी, शिरोळ प्रत्येकी २०, जत, रावेर, जळगाव प्रत्येकी १०. 
मराठवाडा : लातूर ४०, देवणी ३०, उमरगा, औसा, पातूर प्रत्येकी २०, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, निलंगा, माजलगाव, नांदेड, बदनापूर, आंबड, खुल्ताबाद, कळंब, उस्मानाबाद प्रत्येकी १०. 
विदर्भ : अहेरी १००, मुलचेरा, गोंडपिंपरी प्रत्येकी ८०, सिरोंचा ७०, चामोर्शी, मुल प्रत्येकी ६०, मोहाडी, राजुरा प्रत्येकी ५०, एटापल्ली, बल्लारपूर, चिमुर प्रत्येकी ४०, भंडारा, मौदा, चंद्रपूर, तुमसर, सिंदेवाही, साकोली, भद्रावती प्रत्येकी ३०, जेवती, रामटेक, सावळी, लाखनी, पारशिवणी प्रत्येकी २०. 
घाटमाथा : दावडी, डुंगरवाडी प्रत्येकी ४०, ताम्हिणी, कोयना, पोफळी प्रत्येकी ३०.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...