agriculture news in Marathi, rain possibility in kokan, Maharashtra | Agrowon

कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

पुणे : ‘वायू’ चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. वादळामुळे पश्चिम किनाऱ्यावर वादळी वारे, उंच लाट उसळून मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (ता. १२) कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाटेची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : ‘वायू’ चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. वादळामुळे पश्चिम किनाऱ्यावर वादळी वारे, उंच लाट उसळून मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (ता. १२) कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाटेची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. 

सोमवारी (ता.१०) नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यात सिन्नर, मालेगाव, येवला, निफाड वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात संततधार पाऊस  पडला. वादळामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले, तर द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. फूलंब्री तालुक्‍यातील खामखेडा येथे शेतात वीज पडून ज्येष्ठ महिला ठार झाली.

भालगाव (ता. गंगापूर) शिवारात वीज पडून चार शेळ्या दगावल्या. पुण्यातील जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, आणि भोर तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांसह धरणांच्या पाणलोटात वादळी पावसाने हजेरी लावली. वादळी पावसामुळे जुन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथे जनावरांसाठी सुरू करण्यात आलेल्या छावणीचे नुकसान झाले. नगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत सोमवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील शेंद्रे परिसरात दमदार वादळी पाऊस झाला.

आज (ता.१२) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तर रायगडमध्ये जोरदार तर पालघर, ठाणे, मुंबईही पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

दरम्यान पूर्वमोसमी पावसामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहे. मंगळवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील जवळपास सर्वच ठिकाणी उष्ण लाट होती. ब्रह्मपुरी येथे ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर, नागपूर येथे तापमान ४६ अंशांपेक्षा अधिक होते. तर राजस्थानच्या चुरू येथे देशातील यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ५०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

मंगळवारी (ता. ११) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.६ (३.४), जळगाव ४२.४ (३.४), कोल्हापूर ३४.८(४.३), महाबळेश्वर २७.८ (४.५), मालेगाव ४२.४ (६.०), नाशिक ३६.३ (२.३), सांगली ३५.४ (३.५), सातारा ३५.२ (४.३), सोलापूर ३७.६ (२.१), अलिबाग ३५.० (३.०), डहाणू ३४.० (०.६), सांताक्रूझ ३५.६ (३.०), रत्नागिरी ३५.१ (४.४), औरंगाबाद ३९.२ (३.९), परभणी ४२.६ (५.३), नांदेड ४२.० (४.४), अकोला ४४.१ (५.७), अमरावती ४३.८ (५.४), बुलडाणा ४१.६ (६.६), ब्रह्मपुरी ४६.७ (८.०), चंद्रपूर ४६.०(६.९), गोंदिया ४२.०(२.५), नागपूर ४६.० (६.९), वर्धा ४५.५ (७.३), यवतमाळ ४३.०(४.९). 
 


इतर अॅग्रो विशेष
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...