कोकणात पावसाचा अंदाज 

अरबी समुद्रात आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली.
Hawaman
Hawaman

पुणे : अरबी समुद्रात आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळ निवळून मध्य प्रदेशाकडे सरकून जाताच राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. ६) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उन्हाचा चटक्यासह ढगाळ हवामानासह उकाड्यातही वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

चक्रीवादळामुळे शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. रत्नागिरी जिल्‍ह्यातील हर्णे येथे १२९ मिलिमीटर, दापोली १२४, तर संगमेश्वर येथे ११२ मिलिमीटर पावसाची नोंद होत अतिवृष्टीची नोंद झाली. मुंबईसह, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळाने अरबी समुद्रावरील बाष्प ओढून नेल्याने विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस थांबला आहे. शुक्रवारी दिवसभर राज्यात अंशत: ढगाळ हवामान होते. उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली होती. आज (ता.६) कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊसः  कोकण : कुलाबा ६३, सांताक्रुझ ५३, अलिबाग ३५, चिपळूण ३८, दापोली १२४, गुहागर ५७, हर्णे १२९, लांजा ५७, मंडणगड ६२, रत्नागिरी ४४, संगमेश्वर ११२, आंबरनाथ ३२, भिवंडी ३५, कल्याण ४५. 

मध्य महाराष्ट्र : चाळीसगाव ४०, गगणबावडा ९०, पन्हाळा ३५, शाहूवाडी ४३, अक्कलकुवा ३५. 

विदर्भ : चिखलदरा ३४.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com