agriculture news in Marathi rain possibility in Kokan Maharashtra | Agrowon

कोकणात पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. तसेच कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाच्या पट्याचा प्रभाव कमी झाला झाल्याने कोकणासह घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे.

पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. तसेच कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाच्या पट्याचा प्रभाव कमी झाला झाल्याने कोकणासह घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. येत्या चार ते पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

कोकणात असलेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या दिशेने सरकले आहे. या भागात चक्रीय स्थिती असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तसेच कर्नाटक किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच मॉन्सूनचा ट्रफ बिकानेर, अजमेर परिसरात असून या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे क्षेत्र मध्य प्रदेश परिसर, दाल्तोगंज, जमशेदपूर ते त्रिपुरा या दरम्यान आहे. बंगालच्या उपसागराच्या उत्तर भाग व परिसरातही येत्या बुधवारी पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरबी समुद्राकडून बाष्प खेचले जाण्याचा अंदाज असल्याने राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

राज्यात होत असलेल्या कमीअधिक पावसामुळे हवेत चांगलाच गारवा तयार झाला आहे. त्यामुळे कमाल तापमानासह किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे. रविवार (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंत सोलापूर येथे ३२.१ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. 

येथे होणार जोरदार पाऊस 
सोमवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर 
मंगळवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 
बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 
गुरुवार ः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रविवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

 • पुणे - २९.१ (१.१) 
 • जळगाव - ३१.७ (-०.६) 
 • कोल्हापूर - २६.२ (-०.६) 
 • महाबळेश्‍वर - १९.९ 
 • मालेगाव - ३०.२ (-०.७) 
 • नाशिक - २७.५ (-१) 
 • सांगली - २४.२ (-४.५) 
 • सातारा - २६.९ 
 • सोलापूर - ३२.१ (०.२) 
 • मुंबई (कुलाबा) - ३१.८ (१.९) 
 • अलिबाग - ३१.७ (१.५) 
 • रत्नागिरी - ३०.२ (१.३) 
 • डहाणू - ३२ (१.४) 
 • औरंगाबाद - ३१.२ (१.४) 
 • परभणी - ३१.३ (-०.१) 
 • बीड- २६.५ (-३.०) 
 • अकोला - २९.८ (-१.९), 
 • अमरावती - २७ (-३.३) 
 • बुलडाणा - ३१ (२.५) 
 • ब्रम्हपुरी - २८.२ (-२.२) 
 • चंद्रपूर - ३०.४ (-०.८) 
 • गोंदिया - २९.४ (-१.८) 
 • नागपूर - २९ (-२) 
 • वर्धा - २८.८ (-१.९) 

इतर अॅग्रो विशेष
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...