agriculture news in Marathi rain possibility in Marathwada and central Maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील काही दिवस पावसाची उघडीप राहणार आहे.

पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील काही दिवस पावसाची उघडीप राहणार आहे. आज (ता.२५) खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत ठिकठिकाणी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी परिसरात असलेले चक्रवाताची स्थिती विरून गेली आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचे तीव्रता कमी झाली आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र उत्तर भाग व परिसर आणि उत्तर प्रदेशचा पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र असून काही भागात चक्रवाताची स्थिती आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ढगाळ हवामानासह कडक ऊन पडेल. तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसतील. आज कोकणातील सर्व जिल्हे, पुणे, कोल्हापूर, सातारा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांत हलक्या काही ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा होईल. 

राज्यात उद्या (ता.२६) नांदेड, लातूर, उस्नानाबाद तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक सरी पडतील. रविवारपासून (ता.२७) राज्यातील काही भागात काही अंशी ढगाळ राहणार असून अनेक भागात ऊन पडेल. त्यामुळे काही प्रमाणात उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे परिसरातही ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडणार असून तुरळक सरी पडतील. तर घाटमाथ्यावरही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


इतर अॅग्रो विशेष
कृषी उद्योजकतेची ‘एबीसी’सन २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ...
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...
मॉन्सूनने घेतला देशातून निरोपपुणे ः परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी...
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...