agriculture news in Marathi, rain possibility in Marathwada and Vidarbha, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने राज्यातील अनेक भागांत कमी-अधिक पाऊस पडत आहे. येत्या सोमवारपर्यंत (ता. २६) राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. कमी पाऊस असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  

पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने राज्यातील अनेक भागांत कमी-अधिक पाऊस पडत आहे. येत्या सोमवारपर्यंत (ता. २६) राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. कमी पाऊस असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  

बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार आहे. ही स्थिती उडिसाच्या दिशेने सरकत आहेत. तसेच उत्तर प्रदेश ते आंध्र प्रदेश यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. याशिवाय मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेश ते बंगालचा उपसागर यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. यामुळे काही ठिकाणी मुसळधार पडत आहे. चित्रकूट आणि मलकानगिरी येथे देशातील सर्वाधिक १७० मिलिमीटर पाऊस पडला. तर हरदोई, मंगलोर, कुभोकनम, विजयवाडा, मच्छलीपट्टनम, खजुराहो येथेही जोरदार पाऊस पडला. राज्यातही अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

वाढलेल्या उकाड्यामुळे राज्याच्या अनेक भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात व पूर्व विदर्भात हवामान ढगाळ आहे. गुरुवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात कोकणातील अंबरनाथ येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस पडला. तसेच उल्हासनगर, बेलापूर, कल्याण, माथेरान, ठाणे, भिवंडी, भिरा, सुधागड, पाली, विक्रमकड, वाडा, कर्जत, पनवले, पोलादपूर, रोहा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून भिवपुरी, खंद, ताम्हिणी, डुंगरवाडी या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पश्चिम पट्टा व खान्देशातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर इगतपुरी, पाचोरा, पारोळा, पेठ येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.   

मराठवाड्यातही पावसाच्या काही प्रमाणात तुरळक सरी पडत आहेत. तर कळंब, नांदेड, सेलू, शिरूर कासार, बीड, घनसांगवी, माजलगाव, पाथरी, सोनपेठ येथे मध्यम स्वरूपाचा सरी कोसळल्या. तर औसा, भूम, बिलोली, गेवराई, मुदखेड, परतूर, तुळजापूर, उमरी, वाशी या ठिकाणी हलका पाऊस पडला. विदर्भातील पोभुर्णा येथे ६० मिलिमीटर पाऊस पडला. तर बल्लारपूर, गोंडपिंपरी, गोरेगाव, तिरोरा येथे मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या.  

गुरुवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग)  
कोकण ः अंबरनाथ ८०, उल्हासनगर ७०, बेलापूर, कल्याण, माथेरान, ठाणे ६०, भिवंडी ५०, भिरा, सुधागड, पाली, विक्रमकड, वाडा ४०, कर्जत, पनवले, पोलादपूर, रोहा ३०, दापोली, जव्हार, महाड, उरण, वाकवली २०, कानकोना, चिपळून, खेड, माणगाव, म्हापसा, मोखेडा, मुल्दे, पेण, राजापूर, रामेश्वर कृषी, संगमेश्वर देवरूख, सावंतवाडी, वैभववाडी १०. 
मध्य महाराष्ट्र ः इगतपुरी ५०, पाचोरा, पारोळा, पेठ ४०, नगर, महाबळेश्वर, शहादा ३०, गिरना, हरसूल, नंदुरबार, रावेर, सिंदखेडा, सुरगाणा २०, अक्कलकुवा, चाळीसगाव, गगनबावडा, नांदगाव, पौड, मुळशी, सोलापूर, त्र्यंबकेश्वर, वडगाव मावळ, यावल १० .
मराठवाडा ः कळंब, नांदेड, सेलू, शिरूर कासार ४०, बीड, घनसांगवी, माजलगाव, पाथरी, सोनपेठ २०, औसा, भूम, बिलोली, गेवराई, मुदखेड, परतूर, तुळजापूर, उमरी, वाशी १०.
विदर्भ ः पोभुर्णा ६०, बल्लारपूर, गोंडपिंपरी, गोरेगाव, तिरोरा ३०, चार्मोशी, चिखलदरा, गडचिरोली, मूल, मूलचेरा, सडकअर्जुनी, सावनी, सिंरोचा २०, अहीरी, देऊळगाव राजा, देवरी, धानोरा, एटापल्ली, गोंदिया, जेवती, कुरखेडा, नागभीड, साकोली, समुद्रपूर, सेलू १० 
घाटमाथा ः भिवपुरी ८०, खंद ७०, ताम्हिणी ६०, डुंगरवाडी ५०, लोणावळा, शिरगाव, ठाकूरवाडी, अंबोणे, वाणगाव ४०, दावडी, कोयाना, खोपोली ३०, शिरोटा, वळवण, कोयना १०.

इतर अॅग्रो विशेष
अंगावर काटा येणारच!देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मधुरेमध्ये दाखल...
कामाच्या दर्जात तडजोड न स्वीकारणारा...सर विश्वेश्वरय्या यांच्या कामाची मुहूर्तमेढ धुळे...
कांदा दरवाढीचा कल कायम राहणारपुणे : केंद्र सरकारकृत एमएमटीसी या ट्रेडिंग...
साखर निर्यातीची अधिसूचना अखेर जारीपुणे : देशातील भरमसाठ साखरेचा साठा बघता ६० लाख टन...
जोर काहीसा ओसरला; मंगळवारपासून पावसाची...पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर काहीसा...
पूरस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत...मुंबई: जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट...
दरवर्षी १०० गावे आदर्श करणार ः...पुणे  : राज्याच्या ग्रामविकासाला आदर्श गाव...
‘समृद्धी’साठी २८ हजार कोटींचे कर्ज...मुंबई: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग या...
निर्यातक्षम गुणवत्तेच्या पेरूचे उत्पादनसातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील कृषिभूषण मनोहर...
बुके, हारांसह फूल ‘डेकोरेशन’ झाला सक्षम...नाशिक जिल्ह्याने फूल सजावटीच्या व्यवसायातही आघाडी...
ग्रामपंचायतींना मिळाला कृषी कक्षपुणे : राज्यातील साडेअकरा हजार कृषी सहायकांना...
‘वान’च्या पाणी आरक्षणाला...अकोला  ः जिल्ह्यातील वान प्रकल्पातून अकोला...
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी...सांगली ः पावसाळा संपत आला तरी तासगाव तालुक्याच्या...
संत्रा छाटणीकरिता आता विदेशी सयंत्राचा...नागपूर ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
गटशेती योजना चांगली; पण...रा ज्यातील शेती लहान लहान तुकड्यांमध्ये विभागली...
मराठवाड्यात उसाला पर्याय हवाचयावर्षी मराठवाड्यात पडलेला तुटपुंजा पाऊस, ६६ पैकी...
गडचिरोलीत पूरस्थिती कायम; कोल्हापुरात...नागपूर/कोल्हापूर ः मध्य प्रदेशात पावसाचा जोर कायम...
एफआरपीच्या व्याजाबाबत साखर आयुक्तालयात...पुणे  : उसाच्या थकीत एफआरपीचे विलंब व्याज...
जोर ओसरला; उत्तर कोकण, उत्तर...पुणे : ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून जवळपास दोन...
तीर्थपुरी गावाची होतेय मोसंबी पिकात ओळखतीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) भागातील...