सोमवारपासून पाऊस जोर धरण्याची शक्यता

सोमवारपासून पाऊस जोर धरण्याची शक्यता
सोमवारपासून पाऊस जोर धरण्याची शक्यता

पुणे  : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसासाठी पोषक हवामान होत आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सोमवारपासून (ता. २) राज्यात पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून, विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (ता. ३१) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र जमिनीवर येताच हे कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले. सोमवारपर्यंत (ता. २) बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. यातच मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. सोमवारपासून कोकण, विदर्भात बहुतांशी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.  शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात उन्हाचा चटका वाढला होता. अनेक ठिकाणी तापमान ३० ते ३३ अंशांच्या दरम्यान होते. तर सोलापूर येथे सर्वाधिक ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. घाटमाथ्यावरील कोयना पोफळी येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर पाऊस झाला, कोल्हापूर, नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.  शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : हर्णे, पोलादपूर, तळा, कुडाळ प्रत्येकी ५०, मुलदे, रत्नागिरी, माथेरान, मुरूड, श्रीवर्धन, वेंगर्ला प्रत्येकी ४०, सावंतवाडी, वाकवली, दापोली, म्हसळा, मालवण, वैभववाडी, गुहागर, रोहा प्रत्येकी ३०.  मध्य महाराष्ट्र : गगणबावडा ७०, नांदगाव, पाथर्डी प्रत्येकी ६०, महाबळेश्वर, श्रीरामपूर प्रत्येकी ५०, नेवासा ४०, राहूरी, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा प्रत्येकी ३०, इगतपुरी, शेवगाव, नगर, पाटण प्रत्येकी २०.  मराठवाडा : पैठण ७०, जळकोट, वैजापूर, निलंगा ३०, हिमायतनगर, गंगापूर, परळी वैजनाथ, पाथरी प्रत्येकी २०.  विदर्भ : पारशिवणी ५०, सावनेर ३०, नांदगावकाझी, नरखेडा, नागपूर प्रत्येकी २०, चांदूर रेल्वे, चिखलदारा, वर्धा, सावळी, ब्रह्मपुरी, कामठी, बाभुळगाव, रामटेक प्रत्येकी १०.  घाटमाथा : कोयना पोफळी १३०, ताम्हिणी, दवडी ३०, डुंगररवाडी २०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com