agriculture news in Marathi, rain possibility from Monday, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सोमवारपासून पाऊस जोर धरण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

पुणे  : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसासाठी पोषक हवामान होत आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सोमवारपासून (ता. २) राज्यात पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून, विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (ता. ३१) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

पुणे  : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसासाठी पोषक हवामान होत आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सोमवारपासून (ता. २) राज्यात पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून, विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (ता. ३१) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र जमिनीवर येताच हे कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले. सोमवारपर्यंत (ता. २) बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. यातच मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. सोमवारपासून कोकण, विदर्भात बहुतांशी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात उन्हाचा चटका वाढला होता. अनेक ठिकाणी तापमान ३० ते ३३ अंशांच्या दरम्यान होते. तर सोलापूर येथे सर्वाधिक ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. घाटमाथ्यावरील कोयना पोफळी येथे सर्वाधिक १३० मिलिमीटर पाऊस झाला, कोल्हापूर, नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. 

शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : हर्णे, पोलादपूर, तळा, कुडाळ प्रत्येकी ५०, मुलदे, रत्नागिरी, माथेरान, मुरूड, श्रीवर्धन, वेंगर्ला प्रत्येकी ४०, सावंतवाडी, वाकवली, दापोली, म्हसळा, मालवण, वैभववाडी, गुहागर, रोहा प्रत्येकी ३०. 
मध्य महाराष्ट्र : गगणबावडा ७०, नांदगाव, पाथर्डी प्रत्येकी ६०, महाबळेश्वर, श्रीरामपूर प्रत्येकी ५०, नेवासा ४०, राहूरी, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा प्रत्येकी ३०, इगतपुरी, शेवगाव, नगर, पाटण प्रत्येकी २०. 
मराठवाडा : पैठण ७०, जळकोट, वैजापूर, निलंगा ३०, हिमायतनगर, गंगापूर, परळी वैजनाथ, पाथरी प्रत्येकी २०. 
विदर्भ : पारशिवणी ५०, सावनेर ३०, नांदगावकाझी, नरखेडा, नागपूर प्रत्येकी २०, चांदूर रेल्वे, चिखलदारा, वर्धा, सावळी, ब्रह्मपुरी, कामठी, बाभुळगाव, रामटेक प्रत्येकी १०. 
घाटमाथा : कोयना पोफळी १३०, ताम्हिणी, दवडी ३०, डुंगररवाडी २०. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा उद्यापासून...औरंगाबाद ः कृषी निविष्ठा  विक्रेत्यांच्या...
सफरचंद झाडाला फळधारणा ! नाशिकच्या...नाशिक : जिल्हा फलोत्पादन व विविध प्रयोगात आघाडीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडणाऱ्या...
एकाच आॅनलाइन अर्जावर कृषी योजनांचा लाभ...मुंबई  : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...
लातूर जिल्ह्यात पोलिसांनी बांधावर जात...लातूर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या...
न्यायालयाच्या भूमिकेनंतर गुणनियंत्रण...पुणे  : बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या...