उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

पुणे: मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. तर, धुळे, जळगाव आणि नंदूरबार या जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. आज (ता. ११) उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार आणि उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  सोमवारी (ता. ९) दिवसभर पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नगर जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्‍वर येथे सर्वाधिक १४१ मिलिमीटर; तर पिंपळगाव बसवंत येथे १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक भागांत पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे.  कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकल्याने आज गुजरात, पश्‍चिम मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाकडे सरकण्याचे संकेत असल्याने राज्यात पाऊस थांबणार आहे. शुक्रवारपासून (ता. १३) कोकण वगळता राज्यात पावसाची उघडीप शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :  कोकण : सांताक्रुझ ५४, डहाणू ५७, जव्हार ७३, मोखेडा ४८, भिरा ४३, माथेरान ७८, पोलादपूर १०१, सुधागडपाली ५२, चिपळूण ४०, दापोली ८०, खेड ७८, मंडणगड ४८, मुरबाड ६६, उल्हासनगर ४०. मध्य महाराष्ट्र : अकोले ६०, शेवगाव ४३, अमळनेर ५८, बोधवड ४१, दहीगाव ४६, धरणगाव ४०, एरंडोल ८५, गगणबावडा ६०, पन्हाळा ३७, राधानगरी ४९, नंदुरबार ४४, दिंडोरी ६८, इगतपुरी ८०, ओझरखेडा ४५, पिंपळगाव बसवंत १२६, सुरगाणा ८१, त्र्यंबकेश्वर १४१, पौड ३९, महाबळेश्वर ९८.  मराठवाडा : सोयगाव २४, वैजापूर २६. विदर्भ : पातूर २२, बुलडाणा २३, मेहकर २७, कुरखेडा २३, देवरी २१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com