agriculture news in Marathi, rain possibility in north Kokan and north Maharashtra, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

पुणे: मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. तर, धुळे, जळगाव आणि नंदूरबार या जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. आज (ता. ११) उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार आणि उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे: मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असल्याने राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. तर, धुळे, जळगाव आणि नंदूरबार या जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. आज (ता. ११) उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार आणि उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

सोमवारी (ता. ९) दिवसभर पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नगर जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्‍वर येथे सर्वाधिक १४१ मिलिमीटर; तर पिंपळगाव बसवंत येथे १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक भागांत पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. 

कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकल्याने आज गुजरात, पश्‍चिम मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, कोकणात पावसाची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाकडे सरकण्याचे संकेत असल्याने राज्यात पाऊस थांबणार आहे. शुक्रवारपासून (ता. १३) कोकण वगळता राज्यात पावसाची उघडीप शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मंगळवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : 
कोकण : सांताक्रुझ ५४, डहाणू ५७, जव्हार ७३, मोखेडा ४८, भिरा ४३, माथेरान ७८, पोलादपूर १०१, सुधागडपाली ५२, चिपळूण ४०, दापोली ८०, खेड ७८, मंडणगड ४८, मुरबाड ६६, उल्हासनगर ४०.
मध्य महाराष्ट्र : अकोले ६०, शेवगाव ४३, अमळनेर ५८, बोधवड ४१, दहीगाव ४६, धरणगाव ४०, एरंडोल ८५, गगणबावडा ६०, पन्हाळा ३७, राधानगरी ४९, नंदुरबार ४४, दिंडोरी ६८, इगतपुरी ८०, ओझरखेडा ४५, पिंपळगाव बसवंत १२६, सुरगाणा ८१, त्र्यंबकेश्वर १४१, पौड ३९, महाबळेश्वर ९८. 
मराठवाडा : सोयगाव २४, वैजापूर २६.
विदर्भ : पातूर २२, बुलडाणा २३, मेहकर २७, कुरखेडा २३, देवरी २१.

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात ज्वारीची पावणे तीन लाख...नगर : जिल्ह्यामधील बहुतांश भागात गेल्या आठ...
साताऱ्यात जोरदार पावसाने स्ट्रॉबेरीचे...सातारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी परतीच्या...
कर्जत- जामखेडमध्ये सर्वांची प्रतिष्ठा...नगर : दोन वेळा मतविभागणीमुळे पालकमंत्री राम शिंदे...
मराठवाड्यात ११० मंडळांत पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ११०...
मुळशी तालुक्यात परतीच्या पावसामुळे...कोळवण : मुळशी तालुक्यात परतीच्या पावसामुळे...
परभणी येथील दुग्धशाळेतील दूध संकलनात घटपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
मराठवाड्यातील ५३१ गावांत, वाड्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३१ गावे-वाड्यांची तहान...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड  : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड,...
मनमाड बाजार समितीमध्ये नवीन मका विक्री...नाशिक : नांदगाव तालुक्यात मका काढणीला सुरवात झाली...
खरीप मळण्यांना पावसाचा फटकाकोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात...
शेतकरीकन्या मंजूषा पगारची भारतीय बेसबॉल...नाशिक : मालेगाव तालुक्यातील विराणे येथील शेतकरी...
खानदेशात ज्वारीची दिवाळीपूर्वी कापणी...जळगाव ः शासनाकडून भरडधान्य म्हणजेच ज्वारी, मका...
व्यापाऱ्यांकडून मुगाची कमी भावाने खरेदीनांदुरा, जि. बुलडाणा : पावसाने उघडीप दिल्याने...
‘पंदेकृवि’मध्ये जागतिक कापूस दिन साजराअकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात...
तरुणांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड...सोलापूर ः ‘‘उद्योजकता प्रशिक्षणातून शेतीपूरक...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सोयाबीन उत्पादनासाठी गंधकाचा वापर...अकोला ः शेतातील काडी कचरा न जाळता खत...
को-मार्केटिंगची पायाभरणी करणारा माजी...पुणे : "राज्यातील शेतकऱ्यांना को-मार्केटिंगच्या...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...