agriculture news in Marathi rain possibility overall state Maharashtra | Agrowon

सर्वदूर पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 जुलै 2021

मॉन्सून चांगलाच सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक भागांत पाऊस बरसत आहे. कोकणात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे.

पुणे : मॉन्सून चांगलाच सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक भागांत पाऊस बरसत आहे. कोकणात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. राज्यात पुढील आठवडाभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर व विदर्भाच्या काही भागांत मुसळधार होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर अरबी समुद्रावरून मॉन्सूनचे प्रवाह बळकट झाले आहेत. या दोन्ही स्थिती पोषक ठरल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पश्‍चिम राजस्थानपासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात हवेचे पूर्वपश्‍चिम जोडक्षेत्र कायम आहे. यातच अरबी समुद्रावरून वाऱ्यांचे प्रवाह वाढू लागले आहेत. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. 

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात विविध भागांत कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. पावसाचा जोर अधिक नसला तरी जवळपास सर्वदूर हलक्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा तयार झाला आहे. त्यामुळे मागील आठवड्यात वाढलेला कमाल तापमानाचा पारा पुन्हा खाली आला आहे. रविवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील अकोला येथे ३४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. 

राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी अधूनमधून कडक ऊन पडत आहे. त्यामुळे उकाडा वाढत असून, पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. या भागात ३२ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मराठवाड्यात २८ ते ३१ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात २२ ते ३४ अंश सेल्सिअस, कोकणात २८ ते २९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. 
----------------- 
चौकट 
मॉन्सून आज प्रगती 
करण्याची शक्यता 
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीसह वायव्य भारतातील मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबले आहे. १० जुलै रोजी मॉन्सून दिल्लीत दाखल होण्याची शक्यता होती. मात्र अद्यापही मॉन्सूनची प्रगती झालेली नसून, अजूनही तो मंदावलेलाच आहे. आज (ता. १२) दिल्लीसह वायव्य भारतात प्रगती करण्याची शक्यता आहे. दरम्यान 
बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वायव्य भारताकडे येऊ लागल्याने मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान तयार झाले आहे. हे वारे दिल्ली, हरियाना, पूर्व राजस्थानपर्यंत पोचले आहेत. या भागात आर्द्रता देखील वाढली आहे. 
------------- 
येथे होणार जोरदार पाऊस : 
सोमवार ः पूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, वाशीम 
मंगळवार ः संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर 
बुधवार ः संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, नांदेड, परभणी, यवतमाळ, जालना, हिंगोली, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ 
गुरुवार ः संपूर्ण कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना 
---------------- 
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रविवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) (सात झालेली वाढ) 

पुणे - २९.८ (०.९) 
कोल्हापूर - २८.२ (०.८) 
महाबळेश्‍वर - २२.६ (२.४) 
मालेगाव - ३४.६ (३.२) 
नाशिक - ३०.१ (०.५) 
सांगली - २९.७ (०.५) 
सातारा - ३० (२.५) 
सोलापूर - ३०.४ (-१.६) 
मुंबई (कुलाबा) - २८.६ (-१.८) 
डहाणू - २९.७ (-१.५) 
रत्नागिरी - २९.१ (-०.१), 
औरंगाबाद - ३१.४ (०.८) 
परभणी - ३१.५ (-०.८) 
अकोला - ३४.८ (२.१), 
अमरावती - ३३.२ (१.७) 
बुलडाणा - ३२ (२.७) 
ब्रह्मपुरी - ३४.७ (३.२) 
चंद्रपूर - ३४.६ (२.५) 
गोंदिया - ३२.२ (०.३) 
नागपूर - ३४.३ (२.१) 


इतर अॅग्रो विशेष
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...