agriculture news in Marathi, Rain possibility in several places, Maharashtra | Agrowon

काही भागांत उद्या हलक्या पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पुणे: बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेशाच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. राज्यातील बहुतांशी भागात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज (ता. २४) राज्यात काही प्रमाणात पावसाची उघडीप राहणार आहे. उद्या (ता. २५) राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

पुणे: बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेशाच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. राज्यातील बहुतांशी भागात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज (ता. २४) राज्यात काही प्रमाणात पावसाची उघडीप राहणार आहे. उद्या (ता. २५) राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

अरबी समुद्र आणि गुजरातच्या परिसरात असलेल्या चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकत आहे. हे चक्रीवादळ गुजरातमधील वेरावल वायव्येकडे १५० किलोमीटर, तर पाकिस्तानमधील कराचीपासून आग्नेयेकडे ६१० किलोमीटर, तर ओमानमधील मस्कतपासून आग्नेयेकडे १२२० किलोमीटर अंतरावर आहे. या चक्रीवादळाची तीव्रता आज वाढणार असून, पुढील तीन दिवसांत ओमानकडे सरकेल. या चक्रीवादळाने राज्यातील काही भागांत असलेले बाष्प ओढून घेतल्याने राज्यात काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, उत्तराखंड ते राजस्थान या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, ते पंजाबकडे सरकत आहे. यामुळे काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. 

राज्यात सोमवारी (ता. २३) दिवसभर कोकण व मध्य महाराष्ट्रात अंशतः हवामान ढगाळ होते. तर मराठवाडा व विदर्भात ऊन चटका वाढलेला होता. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सोलापूर येथे ३४.७ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. पुणे, कोल्हापूर, मुंबई, डहाणू, परभणी, ब्रह्मपुरी येथील कमाल तापमानातही वाढ झाली होती. उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीएवढेच होते. तर ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. 

मराठवाड्यातील परळी वैजनाथ येथे ६० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तर पाथरी, गेवराई, अंबड, मंठा, मानवत येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर, कोकणातही सुधागडपाली येथे ४२ मिलिमीटर पाऊस पडला. काही ठिकाणी हलका पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. विदर्भातही बाळानगर येथे ४५.६ मिलिमीटर पाऊस पडला. तर बार्शी टाकळी, मलकापूर, कुरखेडा, तुमसर येथेही हलका पाऊस पडला.

सोमवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग) 
कोकण ः भिरा ५, मानगाव ८, माथेरान ६.२, पोलादपूर १६, सुधागडपाली ४२, गुहागर ९, खेड १२, संगमेश्वर देवरूख १४, 
मध्य महाराष्ट्र ः राहुरी १०.६, श्रीरामपूर २९, धुळे ८, गिधडे ४१, सिंदखेडा ४, भडगाव ४, बोदवड ६, चोपडा १७.१, दहिगाव १३.२, पाचोरा ४, रावेर ४, गगनबावडा ३८, नंदुरबार १३, नवापूर, तळोदा ४, गिरना ६.४, इगतपुरी ४, सटाना ५, वेल्हे ४, 
मराठवाडा ः पैठण ९, फुलंब्री १७, गेवराई ३६, परळी वैजनाथ ६५, वडवानी ४, अंबड २६, बदनापूर ९, भोकरदान १७, मंठा ३६, परतूर १८, गंगाखेड २९, मानवत ४०, पाथरी ६०, सेलू २५, सोनपेठ १८,
विदर्भ ः अकोला १८.१, अकोट ८.३, बाळापूर ४५.६, बार्शीटाकळी ३६.१, धामणगाव ८.३, साकोळी १०.४, तुमसर १७.४, खामगाव १२.६, मलकापूर २७.३, मोताळा १०.५, नांदुरा ७.८, संग्रामपूर ४.२, चिमूर ३.८, गोंडपिंप्री ६.७, कोपर्णा ७.८, मूल ३.३, अहिरी १०.४, अरमोरी ७.३, देसाईगंज, धानोरा ११, गडचिरोली ४.६, कुरखेडा २७.१, अर्जुनी मोरगाव ७.८, गोंदिया ४.१, सडकअर्जुनी ८.१, मंगळूरपीर ७.८, वणी ६.६.


इतर अॅग्रो विशेष
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...
फळांपासून वाइननिर्मितीसाठी महाराष्ट्र...नाशिक : द्राक्षाबरोबर डाळिंब, जांभूळ,...
शिराळा तालुक्यात गुऱ्हाळघरांना उशिरा...सांगली ः शिराळा तालुक्यात यंदा गूळ उत्पादनाचा...
केंद्रीय पथकाकडून कापूस पिकाची पाहणीआरेगाव, यवतमाळ ः गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव...
नाशिक बाजार समितीत व्यापाऱ्याकडून...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
धान उत्पादकांना प्रतिक्विंटल सातशे...मुंबई: आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन...
पंढरपुरात कार्तिकी वारीचा उद्या मुख्य...सोलापूर: कार्तिकी वारी यात्रेचा मुख्य सोहळा उद्या...
‘सौर कृषिपंपा’चा लक्ष्यांक संपल्याने...पुणे : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी मोठ्या...