agriculture news in Marathi, rain possibility in several places, Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

पुणे ः अरबी समुद्रात कमी तीव्रता असलेले क्यार चक्रीवादळ आणि लगत असलेले महा चक्राकार वाऱ्यांचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. यामुळे राज्यात आज (ता. १) आणि उद्या (ता. २) राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

पुणे ः अरबी समुद्रात कमी तीव्रता असलेले क्यार चक्रीवादळ आणि लगत असलेले महा चक्राकार वाऱ्यांचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. यामुळे राज्यात आज (ता. १) आणि उद्या (ता. २) राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून लक्षद्वीपच्या परिसरात महा नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेकडे असले तरी ते अरबी समुद्राच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाचा वेळ ताशी १७ किलोमीटर एवढा असून त्याची तीव्रता वाढणार आहे. हे चक्रीवादळ अमिनीदिवीपासून नैर्ऋ्त्याककडे ४० किलोमीटर, तर मिनीकायपासून ३५० किलोमीटर, कावारत्तीपासून ११० किलोमीटर तर केरळमधील कोझीकोडपासून ३२५ किलोमीटर अंतरावर आहे. तर अरबी समुद्रात असलेल्या क्यार चक्रीवादळाचीही तीव्रता कमी झाली असून, ताशी वेग १३ किलोमीटर एवढा आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत.  

सध्या सकाळी काही प्रमाणात ढगाळ हवामान असले तरी नऊ दहा वाजेनंतर उन्हाचा चटका वाढत आहे. दुपारी कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळी ढग जमा होऊन पाऊस पडत आहे. मात्र, दुपारी उन्हाच्या वाढलेल्या तापमानामुळे कमाल तापमानाची चांगलीच वाढ होत आहे. गुरुवारी (ता. ३१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मुंबईजवळील सांताक्रुझ येथे सर्वाधिक ३६.४ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

बुधवारी (ता. ३०) सायंकाळी बीडमधील शिरूर कासार, पाटोदा, बीड नगरमधील पाथर्डी, नाशिकमधील दिंडोरी, नाशिक, पुणे जिल्ह्यांतील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, बारामती, शिरूर, हवेली, दौड, इंदापूर, खेड या तालुक्यांतील बहुतांशी भागात झालेल्या पावसामुळे भात, सोयाबीन, बाजरी, कपाशी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले.

गुरुवारी (ता. ३१) सकाळी आठ वाजेपर्यंत विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.८ (-०.३), लोहगाव ३१.० (-१.०), जळगाव ३२.४ (-१.६), कोल्हापूर ३०.५ (-०.४), महाबळेश्वर २४.१ (-१.४), मालेगाव ३०.२ (-२.५), नाशिक ३०.५ (-१.२), सांगली ३१.५  (-०.२), सातारा ३०.०, सोलापूर ३१.७ (-०.३), मुंबई ३५.२ (१.४), सांताक्रुझ ३६.४ (२.२), अलिबाग ३३.४ (०.२), रत्नागिरी ३५.३ (२.०), डहाणू ३४.२ (०.९), औरंगाबाद २९.८ (-१.२), परभणी ३१.५ (०.१), नांदेड ३२.० (-०.५), अकोला ३२.९ (०.३), अमरावती ३१.४ (-१.०), बुलढाणा ३०.५ (०.८), ब्रम्हपुरी ३४.२ (२.९), चंद्रपूर ३२.६ (०.८), गोंदिया ३२.० (०.५), नागपूर ३३.२ (१.६), वर्धा ३२.२ (०.७), यवतमाळ ३२.५ (१.९)

 


इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...