agriculture news in Marathi rain possibility in several places Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

राज्याच्या अनेक भागात कमाल तापमान चाळीशीपार असल्याने कडक उन्हाळा जाणवत आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.११) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. 

पुणे : राज्याच्या अनेक भागात कमाल तापमान चाळीशीपार असल्याने कडक उन्हाळा जाणवत आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.११) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. उन्हाचा वाढलेला चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, विदर्भासह, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानाचा पारा ४१ ते ४४ अंशांदरम्यान राहणार आहे. अकोला येथे तापमान सातत्याने ४४ अंशाच्या वर आहे. तर विदर्भाला ऊन अक्षरशः भाजून काढत आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातही चटका चांगलाच वाढला आहे. विदर्भापासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे.

यामुळे राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण अंदमान समुद्र, सुमात्राच्या किनारपट्टी परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. बुधवारपर्यंत (ता.१३) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.६, जळगाव ४३.५, धुळे ४२.६, कोल्हापूर ३९.२, महाबळेश्‍वर ३३.५, मालेगाव ४३.२, नाशिक ३९.१, निफाड ४०.१, सांगली ३९.८, सोलापूर ४१.७, डहाणू ३४.३, सांताक्रूझ ३४.०, रत्नागिरी ३४.३, औरंगाबाद ४१.७, परभणी ४३.०, नांदेड ४२.०, अकोला ४४.३, अमरावती ४३.२, बुलडाणा ४१.६, ब्रह्मपुरी ४१.५, चंद्रपूर ४३.५, गोंदिया ४०.२, नागपूर ४२.९, वर्धा ४२.८, यवतमाळ ४३.५. 


इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...