तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता 

आज (ता.२९) ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या बारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
Hawaman
Hawaman

पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची स्थिती आहे. यामुळे आज (ता.२९) ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या बारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.   पावसाने विश्रांती दिली असून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. उन्हाच्या चटक्यासह कमाल तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर पुण्यातही उन्हाचा पारा वाढत असून उकाड्यात वाढ होत असल्याची स्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंध्र प्रदेशच्या परिसरातही तयार झालेली चक्रवाताची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवस राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता.२९) राज्यातील मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात उन्हासह काही अंशी ढगाळ वातावरण राहील.   राज्यात उद्या (ता.३०) धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तर कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पावसाची उघडीप राहणार असून दिवसभर ऊन पडेल. पुणे परिसरातही काही प्रमाणात  तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com