agriculture news in Marathi rain possibility in several places Maharashtra | Page 2 ||| Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

आज (ता.२९) ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या बारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची स्थिती आहे. यामुळे आज (ता.२९) ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गडचिरोली या बारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  

पावसाने विश्रांती दिली असून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. उन्हाच्या चटक्यासह कमाल तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे ३४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर पुण्यातही उन्हाचा पारा वाढत असून उकाड्यात वाढ होत असल्याची स्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंध्र प्रदेशच्या परिसरातही तयार झालेली चक्रवाताची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवस राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज (ता.२९) राज्यातील मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात उन्हासह काही अंशी ढगाळ वातावरण राहील.  

राज्यात उद्या (ता.३०) धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तर कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पावसाची उघडीप राहणार असून दिवसभर ऊन पडेल. पुणे परिसरातही काही प्रमाणात  तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे.


इतर अॅग्रो विशेष
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...
जोरदार पावसाचा अंदाज पुणे ः राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...