तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता 

आज (ता.२५) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
Hawaman
Hawaman

पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. आज (ता.२५) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

कर्नाटकाची किनारपट्टी आणि अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्याचा परिणाम कोकण व महाराष्ट्रातील काही भागावर होत असल्याने तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. उद्या (ता.२६) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत  काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मराठवाडा काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून विदर्भात पावसाची उघडीप राहील. 

सध्या राज्यातील काही भागांत होत असलेल्या पावसामुळे सकाळी धुके पडण्यास सुरूवात झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com