agriculture news in Marathi rain possibility in several places Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

बंगालच्या उपसागराच्या आग्नेय व नैऋत्य भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. त्याची तीव्रता आज (ता.२४) आणखी वाढणार असून वारे वायव्येच्या दिशेकडे असलेल्या तमिळनाडू व पॉंडेचेरी, कारीकल आणि ममल्लापुरम या भागाकडे सरकणार आहे.

पुणे ः बंगालच्या उपसागराच्या आग्नेय व नैऋत्य भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. त्याची तीव्रता आज (ता.२४) आणखी वाढणार असून वारे वायव्येच्या दिशेकडे असलेल्या तमिळनाडू व पॉंडेचेरी, कारीकल आणि ममल्लापुरम या भागाकडे सरकणार आहे. त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांवर होणार आहे. यामुळे या भागात उद्यापासून (ता.२५) तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तर भारतात असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातील वातावरणावर होऊ लागला आहे. राज्यात हवामान कोरडे असल्याने काही प्रमाणात थंडी वाढण्यास सुरूवात झाली असली तरी काही भागात अजूनही चढउतार सुरू आहेत. विदर्भाच्या पूर्व भागात थंडीने पुन्हा जम बसविला आहे. किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. सोमवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे १०.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली.  

विदर्भापाठोपाठ कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही हवामान कोरडे असल्याने काही प्रमाणात गारठा वाढला आहे. सकाळपासून ऊन असल्याने काही ठिकाणी उकाडा वाढत आहे. त्यामुळे कमाल तापमानात किंचित वाढ होत असली तरी पहाटे वाढत असलेल्या गारठ्यामुळे किमान तापमानात घट होत आहे.
विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे.

अमरावती, गोंदिया, वर्धा येथील किमान तापमानात घट होऊन चांगलाच गारठा वाढला आहे. तर यवतमाळ, बुलडाणा, अकोला, नागपूर या भागातही किमान तापमान सरासरीएवढे आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणातही किमान तापमानात किंचित घट झाली असून हळूहळू गारठा वाढू लागला आहे.

सोमवारी (ता.२३) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान. (अंश सेल्सिअस). मुंबई (सांताक्रुझ) २०.०, अलिबाग २०.८ (१), ठाणे २४.२, रत्नागिरी २३.२ (२), डहाणू १९.१(-१), पुणे १९.३ (५), जळगाव १८.० (५), कोल्हापूर १९.५ (३), महाबळेश्वर १६.४ (२), मालेगाव १६.६ (३), नाशिक १५.० (३), निफाड १५.४, सांगली १९.१ (३), सातारा १८.५ (३), सोलापूर २०.६ (४), औरंगाबाद १७.४ (४), परभणी १६.४ (२), परभणी कृषी विद्यापीठ १५.८, नांदेड २१.० (७), उस्मानाबाद १९.० (५), अकोला १६.१ (१), अमरावती १३.३ (-३), बुलडाणा १६.५, चंद्रपूर १६.४ (१), गोंदिया १०.८ (-५), नागपूर १३.८, वर्धा १४.४ (-१), यवतमाळ १५.५

येथे होणार पाऊस 
बुधवार
ः भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया. 
गुरुवार ः सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.  
शुक्रवार ः सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ.


इतर अॅग्रो विशेष
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...