agriculture news in Marathi rain possibility in several places Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.

पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस काही भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी पडणार आहे. काही ठिकाणी आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

गेल्या काही दिवसांपासून कोकणात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत सकाळपासून उन्हाचा चटका आहे. त्यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात वातावरणातील बदलामुळे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मात्र, दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. कोकणातही तापमानात चढउतार होत आहे. सोमवारी (ता.१४) सकाळच्या आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ४०.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी कमाल तापमानाची नोंद झाली. 

उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते लक्षद्वीपपर्यंत द्रोणीय क्षेत्र कायम आहे. तर वायव्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागापासून ते पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई या भागात आज आणि उद्या या दोन दिवस अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतही अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. विदर्भातही आज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार इशारा देण्यात आला आहे. 

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस 
मंगळवार ः
संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ. 
बुधवार ः संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ. 
गुरूवार ः मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर. 
शुक्रवार ः मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर. 

सोमवारी (ता.१४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३२.६ 
  • अलिबाग - ३१.५ 
  • रत्नागिरी - २८.९ 
  • डहाणू - ३३.२ 
  • पुणे - ३१.६ 
  • जळगाव - ४०.० 
  • कोल्हापूर - २९.० 
  • महाबळेश्वर - २१.१ 
  • नाशिक - ३२.२ 
  • सांगली - ३०.३ 
  • सातारा - ३०.० 
  • सोलापूर - ३३.४ 
  • उस्मानाबाद -- ३१.२ 
  • औरंगाबाद - ३५.३ 
  • परभणी - ३३.७ 
  • नांदेड - ३९.० 
  • अकोला - ३७.० 
  • अमरावती - ३४.४ 
  • बुलडाणा - ३३.० 
  • ब्रम्हपुरी - ३५.६ 
  • चंद्रपूर - ३१.० 
  • गोंदिया - ३७.२ 
  • नागपूर - ३६.२ 
  • वर्धा - ३६.० 
     

इतर बातम्या
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी...गोंदिया : गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
वर्धा : पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीसवर्धा : पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी...
आपद्‌ग्रस्त कुटुंबांना मिळणार पाच हजाररत्नागिरी : अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण,...
पूरबाधित कर्जदारांना सहकार्याची भूमिका...कोल्हापूर : जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व...
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामेअकोला : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या...
रुग्णालयांच्या सुरक्षेचा तपशील दाखल करा...मुंबई : रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत...
परभणीत पशुधन पदविकाधारकांचे आंदोलनपरभणी ः पशुधन पदवीधारकांची जिल्हास्तरावर नोंदणी...
सातारा :बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे...सातारा : कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात...
‘महसूल’ लोकाभिमुख करा ः आयुक्त गमेनाशिक : प्रशासनात चांगले काम केल्यास समाज देवत्व...
मोहोळ, उत्तर सोलापुरात बिबट्याची दहशत...सोलापूर ः चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी...
लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावास...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प.पू...