agriculture news in Marathi rain possibility in several places Maharashtra | Agrowon

कोकणात काही ठिकाणी मुसळधार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊस नसल्याने शेतातील ओल कमी होऊ लागली आहे.

पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊस नसल्याने शेतातील ओल कमी होऊ लागली आहे. त्यामुळे शेतीकामे वेगाने सुरू झाली आहेत. 

कोकणातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला असला, तरी काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांच्या अनेक भागांत पावसाच्या सरीवर सरी पडत आहे. मध्य महाराष्ट्रातही पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात अधूनमधून तुरळक सरी बरसत आहेत. अधूनमधून ऊन पडत असल्याने दिलासा मिळत असला, तरी तुरळक पावसाने भात पिकांची वाढ जोमदारपणे सुरू आहे. पूर्व भागात पाऊस नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव भागांत ऊन पडल्याने पिकांना पाण्याची गरज भासत आहे. मराठवाड्यात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने शेतात मजुरांची लगबग सुरू आहे. 

मंगळवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणक्षेत्रनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) 
भातसा २१, सूर्या धामणी १३, वैतरणा २२, इटियाडोह ५, इरई १०, बेंबळा ५, अरुणावती ६, वान ८, पेनटाकळी ६, गंगापूर २०, भंडारदरा ४३, डिंभे ८, पानशेत १९, वरसगाव २०, पवना ३७, नीरा देवघर १६, भाटघर ६, धोम, कण्हेर ५, धोम बलकवडी २१, वारणा २२, दूधगंगा २४, राधानगरी ६०, कोयना २५. 

मध्यम पावसाची शक्यता 
आज (ता.४) कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह, मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उद्या (ता. ५) महाराष्ट्रातील कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पावसाला पोषक हवामान नसल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

येथे होणार जोरदार पाऊस 
बुधवार ः
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, संपूर्ण राज्यात तुरळक 
गुरुवार ः रायगड, रत्नागिरी, संपूर्ण राज्यात तुरळक 
शुक्रवार ः संपूर्ण राज्यात तुरळक 
शनिवार ः संपूर्ण राज्यात तुरळक  


इतर अॅग्रो विशेष
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...