शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
बातम्या
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
पुणे : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २५) राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील कोर्ची, भामरागड येथे प्रत्येकी ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान यामुळे उकाड्यात वाढ शनिवारी (ता. २४) कायम होती. राज्यात सकाळपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. तर दुपारनंतर विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात ढगांची दाटी झाली होती. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, कोकणात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कमाल तापमानातही चढ-उतार सुरू असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
शनिवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : संगमेश्वर, देवरूख, सावंतवाडी प्रत्येकी ५०, गुहागर, माणगाव पेडणे, श्रीवर्धन, वैभवाडी प्रत्येकी ३०, भिरा, कणकवली, कुडाळ, लांजा, मुरुड, रत्नागिरी प्रत्येकी २०, अलिबाग, अंबरनाथ, बेलापूर, चिपळूण, दोडामार्ग, हर्णे, खालापूर, खेड, मालवण, मंडणगड, माथेरान, म्हसळा, पोलादपूर, राजापूर, रोहा, शहापूर, ठाणे वेंगुर्ला प्रत्येकी १०.
मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ६०, चंदगड, पाटण, पौड, शाहूवाडी प्रत्येकी ३०, महाबळेश्वर, राधानगरी प्रत्येकी २०, अक्कलकोट, हातकणंगले, जत, खटाव, वडूज, लोणावळा प्रत्येकी १०.
मराठवाडा : किनवट, मुदखेड प्रत्येकी १०.
विदर्भ : कोर्ची, भामरागड प्रत्येकी ८०, अहेरी, मुलचेरा प्रत्येकी ६०, चिखलदरा ५०, नागभीड, एटापल्ली, सिंदेवाही प्रत्येकी ४०, चामोर्शी, कुरखेडा, ब्रह्मपुरी, मूल प्रत्येकी ३०, धानोरा, देवरी, अरमेारी, सिरोंचा सावळी, आमगाव, सडक अर्जुनी प्रत्येकी २०,गडचिरोली, चिमूर, भिवापूर, लांखदूर, भद्रावती प्रत्येकी १०.
घाटमाथा : शिरगाव ७०, आंबोणे ५०, ताम्हिणी, कोयना पोफळी, दावडी प्रत्येकी ३०, कोयना नवजा, डुंगरवाडी प्रत्येकी २०.