agriculture news in Marathi rain possibility in several places in state Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे आज (ता.२३) आणि शनिवारी (ता.२४) कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

पुणे ः अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे आज (ता.२३) आणि शनिवारी (ता.२४) कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असून विदर्भात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

बंगाल उपसागराच्या परिसरात असलेल्या वाऱ्याची पश्चिम मध्य भागात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. गुरुवारी हे क्षेत्र आणखी कमी होणार आहे. तर आज त्याची तीव्रता कमी होऊन विरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उघडीप राहील. त्यामुळे राज्यात ऑक्टोबर हीट वाढणार असून कमाल तापमानाचा पारा वाढणार आहे. खानदेशासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या भागातून केव्हाही परतीचा मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे. 

कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व खानदेशातील धुळे जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. शनिवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...
कमी कालावधीत पक्व होणारे मधुर कलिंगड...नाशिक : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन...
किमान तापमानात घट होणार पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार...
डाळिंब दरात मोठी सुधारणासांगली ः राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि...
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...