agriculture news in Marathi rain possibility in several places in state Maharashtra | Agrowon

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

मागील दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात नैर्ऋत्य भागात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे.

पुणे ः मागील दोन ते तीन दिवसांपासून अरबी समुद्रात नैर्ऋत्य भागात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत काही भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

राज्यात बुधवारी दुपारपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. तर गुरुवारी (ता. १०) कोकणात काही अंशी ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला आहे. राज्यातील जवळपास सर्वच भागांतून थंडी कमी झाली आहे. पुढील काही दिवस थंडी कमी-अधिक स्वरूपाची राहणार आहे. गुरुवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ येथे १२ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली आहे.  

अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात काही अंशी कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसानंतर खानदेशातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत काही अंशी ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही थंडी कमी राहणार असून, किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. 

दरम्यान, उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्याला अडथळा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात चढ-उतार असल्याचे दिसून येते. विदर्भात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअस, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात सहा अंश सेल्सिअस, कोकणात पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.

येथे आहे पावसाची शक्यता 
शुक्रवार ः
पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, सातारा.
शनिवार ः सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.
रविवार ः अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.
सोमवार ः अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.

गुरुवारी (ता. १०) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रूझ) २४ (५), अलिबाग २३ (४), ठाणे २२.८, रत्नागिरी २४.५ (४), डहाणू २३.३ (५), पुणे १८.८ (७), कोल्हापूर २१.१ (६), महाबळेश्‍वर १६.९ (३), मालेगाव १८.६ (१), नाशिक १६.३ (५), निफाड १६.८., सांगली २०.८ (६), सातारा १८.७ (५), सोलापूर २० (४), औरंगाबाद १६.१ (५), बीड १५.१ (२), परभणी १३.६, परभणी कृषी विद्यापीठ १२, नांदेड १६ (३), उस्मानाबाद १९.१ (६), अकोला १६.३ (३), अमरावती १८ (३), बुलडाणा १७.४ (३), चंद्रपूर १५.२ (२), गोंदिया १३.८ (१), नागपूर १५.८ (३), वर्धा १५.६ (१), यवतमाळ १५.
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...