agriculture news in Marathi, rain possibility in state, Maharashtra | Agrowon

राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 सप्टेंबर 2019

पुणे : पोषक हवामान झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : पोषक हवामान झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बंगालच्या उपसागरात सोमवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. तर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असल्याने राज्यात पाऊस सुरू झाला असून, काही ठिकाणी मुसळधार हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रातील गिरणा धरण येथे सर्वाधिक १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार होत असून, उकाडा कमी झाला आहे. पावसाची दडी असलेल्या भागात मात्र उन्हाचा चटका वाढला आहे. शनिवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे सर्वाधिक ३५.१ अंश सेल्सिअस, तर नांदेड येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे व सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यता  आहे. 

शनिवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : 

कोकण : कुलाबा ३२, डहाणू २०, वसई ३७, विक्रमगड ३२, अलिबाग ६६, भिरा ३३, कर्जत ३२, खालापूर ७९, महाड ३१, माणगाव ३८, माथेरान ९६, म्हसळा ५७, मुरूड ४५, पनवेल ७१, पेण ५५, पोलादपूर ३७, रोहा ४१, श्रीवर्धन ४२, सुधागड ६६, तळा ३५, हर्णे ३१, खेड ३२, लांजा २०, मंडणगड ३०, रत्नागिरी ४८, संगमेश्वर २५, दोडमार्ग ३२, कणकवली ४४, मुलदे ३४, सावंतवाडी ३१, वैभववाडी २६, अंबरनाथ ४६, मुरबाड २९, उल्हासनगर ५१. 

मध्य महाराष्ट्र : पाथर्डी ३०, चाळीसगाव ५१, चोपडा २२, रावेर २९, गगणबावडा ७२, राधानगरी ३७, शाहूवाडी २५, गिरणा धरण १०६, इगतपुरी ४८, नांदगाव ३२, लोणावळा कृषी ६७, महाबळेश्‍वर ५६. 

मराठवाडा : औरंगाबाद २४, कन्नड ३६, पैठण ३३, फुलांब्री ३५, बीड २०, गेवराई ४५, शिरूर कासार २९, वाडवणी ४०, वसमत २२, आंबड ५३, बदनापूर ४५, भोकरदन ७७, घनसांगवी ६२, जाफराबाद २३, जालना ७५, मंथा २२, पातूर ६३, अहमदपूर ५३, चाकूर ४४, देवणी २३, जळकोट २५, निलंगा ५०, शिरूरअनंतपाळ २०, उदगीर ४२, बिलोली २०, धर्माबाद ३९, कंधार ५०, लोहा ५५, माहूर ५०, मुदखेड २१, नायगावखैरगाव ५२, उमरी ४३, लोहारा ५३, तुळजापूर २८, उमरगा २८, गंगाखेड ४२, परभणी २३, पूर्णा ४७. 

विदर्भ : चांदूर रेल्वे २५, लाखंदूर २०, भद्रावती ३५, चंद्रपूर ३६, गोंडपिंपरी ३४, मूल २८, सिंदेवाही ४७, देसाईगंज ३८, कुरखेडा २०, अर्जुनी मोरगाव २४, सालकेसा ३१, हिंगणा ३३, कामठी २४, कुही ४०, नागपूर २१, नरखेडा ५१, पारशिवणी ३४, रामटेक ५२, रिसोड २३, उमरखेड २९. 

घाटमाथा : कोयना नवजा १००, खोपोली ताम्हिणी प्रत्येकी ८०, आंबोणे दावडी प्रत्येकी ७०, डुंगरवाडी, लोणावळा प्रत्येकी ६०, वळवण ५०, शिरगाव, वाणगाव, खंद प्रत्येकी ४०


इतर अॅग्रो विशेष
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...