agriculture news in Marathi rain possibility in state Maharashtra | Agrowon

राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज 

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजा, गारपीटीसह पावसाने हजेरी लावली.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी पाऊस पडत आहे. शनिवारी (ता.२८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजा, गारपीटीसह पावसाने हजेरी लावली. आज (ता. २९) राज्यात पुर्वमोसमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा असून, कोकणातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद होत, हंगामात प्रथमच पारा ४० अंशांच्या वर गेला. मात्र पावसाळी वातावरण व ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ- उतार सुरू असल्याचे चित्र आहे.

विदर्भाच्या तापमानात पुन्हा वाढ झाली असून, अनेक ठिकाणी तापमान ३६ ते ३८ अंशांदरम्यान आहे, शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरीत राज्यात तापमान ३१ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. 

दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. अरबी समुद्रातून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढग जमा होत आहेत. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता. आज (ता.२९) राज्याच्या अनेक भागात पुर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

शनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६ (१९.८), जळगाव ३२.० (२१.२), कोल्हापूर ३५.६ (२३.६), महाबळेश्‍वर २८.१ (१८.४), मालेगाव ३०.८, नाशिक ३३.१ (१९.७), निफाड ३२.० (१७.०), सांगली -(२३.०), सातारा ३७.१ (२३.५), सोलापूर ३९.१ (२३.६), डहाणू ३२.९ (२४.७), सांताक्रूझ ३५.४ (२३.२), रत्नागिरी ३३.४ (२५.०), औरंगाबाद ३४.० (१९.२), परभणी - (२२.५), अकोला ३८.०(२१.५), अमरावती ३६.४ (२१.६), बुलडाणा ३२.२ (२०.६), ब्रह्मपूरी ३८.९ (२३.४), चंद्रपूर ३८.५ (२१.०), गोंदिया ३५.५ (२१.०), नागपूर ३७.० (२१.९), वर्धा ३७.५ (२३.५). 


इतर अॅग्रो विशेष
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....