agriculture news in Marathi rain possibility in state Maharashtra | Agrowon

राज्यावर पूर्वमासेमी पावसाचे सावट 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 मे 2020

राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.१) व उद्या (ता.२) पावसाचे सावट कायम राहणार आहे. जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे: राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.१) व उद्या (ता.२) पावसाचे सावट कायम राहणार आहे. जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रविवारपासून (ता. ३) राज्याच्या बहुतांशी भागात ढगाळ आकाशासह हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरूवारी (ता.३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव व धुळे येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

राजस्थानपासून मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. समुद्रावरून होणाऱ्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगांची निर्मिती होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. आज (ता.१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान उन्हाचा चटकाही चांगलाच वाढला असून धुळे, जळगावसह मालेगाव, निफाड, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम आणि वर्धा येथे तापामान चाळीशीपार गेले आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा चढताच राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

गुरूवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.८, जळगाव ४३.०, धुळे ४३.०, कोल्हापूर ३६.२, महाबळेश्‍वर ३०.०, मालेगाव ४२.२, नाशिक ३९.२, निफाड ४०.०, सांगली ३६.९, सोलापूर ४०.८, डहाणू ३४.८, सांताक्रूझ ३४.३, रत्नागिरी ३४.०, औरंगाबाद ३९.०, परभणी ४१.७, नांदेड ४०.०, अकोला ४२.६, अमरावती ४०.८, बुलडाणा ४०.४, ब्रह्मपुरी ४०.५, चंद्रपूर ४१.०, गोंदिया ३८.५, नागपूर ४०.१, वाशीम ४२.०, वर्धा ४०.०. 

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र 
बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात आज (ता.१) सकाळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. दक्षिण अंदमान समुद्र, आणि लगतच्या हिंद महासागरामध्ये ढगांची दाटी झाली आहे. आजपासून अंदमान निकोबार बेटसमुहावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उपसागरात चक्रीवादळाचे संकेत असून, ते बांग्लादेश, म्यानमारकडे सरकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. समुद्रात ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहून, समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...