agriculture news in Marathi rain possibility in state Maharashtra | Agrowon

राज्यावर पूर्वमोसमी पावसाचे ढग 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी उन्हाचा ताप कायम आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने उकाड्यातही चांगलीच वाढ झाली आहे.

पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी उन्हाचा ताप कायम आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने उकाड्यातही चांगलीच वाढ झाली आहे. यातच राज्यावर पूर्वमोसमी पावसाचे ढग जमा होत असल्याने आज (ता.९) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजा, जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

शुक्रवारी (ता.८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकणासह कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, ब्रह्मपूरी, गोंदिया वगळता सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पुढे गेला आहे. जळगाव, धुळे, मालेगाव, सोलापूर, अकोला, यवतमाळ येथे उन्हाचा चटका असह्य झाला आहे. राज्याच्या कमाल तापमानाचा पारा कमी अधिक होण्याची शक्यता आहे. 

मध्यप्रदेशापासून महाराष्ट्र, दक्षिणअंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. परिणामी राज्यात पूर्वमोसमीचे ढग जमा होत असून, शुक्रवारी दुपारनंतर विदर्भ, मराठवाड्यात ढग जमा होऊ लागले होते. आज (ता.९) विदर्भ, मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. 

शुक्रवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.१, जळगाव ४३.६, धुळे ४३.०, कोल्हापूर ३९.१, महाबळेश्‍वर ३४.१, मालेगाव ४४.०, नाशिक ३८.६, निफाड ४०.०, सांगली ४१.२, सोलापूर ४३.६, डहाणू ३३.७, सांताक्रूझ ३४.४, रत्नागिरी ३४.०, औरंगाबाद ४१.४, परभणी ४२.७, नांदेड ४२.०, अकोला ४३.६, अमरावती ४०.४, बुलडाणा ४०.८, ब्रह्मपुरी ३८.९, चंद्रपूर ४१.५, गोंदिया ३९.९, नागपूर ४०.५, वर्धा ४०.५, यवतमाळ ४३.५. 

 


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...