agriculture news in Marathi rain possibility in state Maharashtra | Agrowon

हलका ते मध्यम पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

आज (ता.२३) कोकणातील पालघर, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर उस्मानाबाद आणि विदर्भातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.

पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता.२३) कोकणातील पालघर, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर उस्मानाबाद आणि विदर्भातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. 

दोन ते तीन दिवसांपासून तयार झालेली चक्रवाताची स्थिती उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी व उत्तर कोकण परिसरात अजूनही कायम आहे. मात्र, स्थितीची तीव्रता फारशी सक्रिय नाही. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार आहे. परंतु खानदेशातील व मराठवाड्यातील काही भागांत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडेल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल. वऱ्हाडातही हलक्या पावसाच्या सरी बरसतील. पुणे परिसरातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

विदर्भात उद्या मुसळधार शक्य 
उद्या (ता.२५) औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सरी होतील. विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह 
जोरदार पाऊस पडेल. तर अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. 


इतर अॅग्रो विशेष
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...