agriculture news in Marathi rain possibility in state till wednesday Maharashtra | Agrowon

बुधवारपर्यंत पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 मार्च 2021

ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली असली तरी कमाल तापमानात काही अंशी घट झाली आहे. अशीच स्थिती तीन दिवस राहणार असून राज्यातील अनेक भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

पुणे ः ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली असली तरी कमाल तापमानात काही अंशी घट झाली आहे. अशीच स्थिती तीन दिवस राहणार असून राज्यातील अनेक भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट व मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भ व परिसर आणि मध्य प्रदेश या भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तर कर्नाटकाची किनारपट्टी ते मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच तमिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टी परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे.

यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यातील अनेक भागात कमीअधिक प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. यामुळे शनिवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सोलापूर येथे ३७.५ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. 

रविवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः 

 • मुंबई (सांताक्रुझ) ३२.३ 
 • अलिबाग २९.७ 
 • रत्नागिरी ३२.२ 
 • डहाणू ३२.४ 
 • पुणे ३५.८ 
 • जळगाव ३७.२ 
 • कोल्हापूर ३६.५ 
 • महाबळेश्वर ३१.१ 
 • नाशिक ३४.५ 
 • सांगली ३६.४ 
 • सातारा ३५.१ 
 • सोलापूर ३७.५ 
 • औरंगाबाद ३४.२ 
 • परभणी ३५.१ 
 • नांदेड ३७.० 
 • अकोला ३६.५ 
 • अमरावती ३५.० 
 • बुलडाणा ३३.८ 
 • चंद्रपूर ३३.० 
 • गोंदिया ३३.५ 
 • नागपूर ३४ 

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...
तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा...
हापूसच्या ४० हजार पेट्या थेट...रत्नागिरी ः उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी...
कडधान्य उत्पादनात ६५ टक्के वाढ पुणे ः देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...