agriculture news in Marathi, rain possibility from tomorrow, Maharashtra | Agrowon

उद्यापासून पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

पुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक स्थिती आहे. गुरुवारपासून (ता. १८) राज्यात सर्वदूर पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. आज (ता. १७) कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक स्थिती आहे. गुरुवारपासून (ता. १८) राज्यात सर्वदूर पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. आज (ता. १७) कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होता. हा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने दोन दिवसांत मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. यातच म्यानमारच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही स्थिती पोषक ठरल्याने राज्यात गुरुवारपासून पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे.

कोकण आणि घटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी येत आहेत. मराठवाडा, विदर्भात पावसाची उघडीप कायम आहे. शुक्रवारपासून विदर्भात पाऊस वाढणार असून, मराठवाड्यातही पाऊस पडण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे.  

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : चिपळूण ११०, संगमेश्वर १००, पोलादपूर, वैभववाडी प्रत्येकी ९०, राजापूर ८०, रत्नागिरी, लांजा प्रत्येकी ७०, वेंगुर्ला, गुहागर, कणकवली, खेड प्रत्येकी ५०, दोडामार्ग, श्रीवर्धन, मुरूड, सावंतवाडी प्रत्येकी ४०, देवगड ३०. 
मध्य महाराष्ट्र : गगणबावडा ८०, महाबळेश्वर, राधानगरी प्रत्येकी ४०, पाटण, पन्हाळा प्रत्येकी २०. 
घाटमाथा : कोयना नवजा १००, शिरगाव, कोयना पाफळी प्रत्येकी ६०, दावडी ५०, आंबोणे ४०.

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...