उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचदरम्यान अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागातही चक्रावाताची स्थिती तयार झाली आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. गुरुवारी (ता. १२) आणि शुक्रवारी (ता. १३) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत हवामान ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात हवामान ढगाळ आहे. यामुळे थंडी कमी झाली असून, अनेक भागांत किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत. मंगळवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे १२.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भातील नागपूर येथेही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट होऊन १२.५ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले. त्यामुळे या भागात काही प्रमाणात थंडीची ऊब कायम आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यात हवामान कोरडे झाले होते. त्यामुळे थंडीने चांगलाच जम बसविण्यास सुरुवात केली होती. थंडीमुळे किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मात्र, पुन्हा बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचे व चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाल्याने सकाळपासून हवामान ढगाळ होत आहे. परिणामी, किमान तापमानात पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली  आहे. कोकणात २२ ते २३, मध्य महाराष्ट्रात १३ ते १९ मराठवाड्यात १२ ते १७ अंश सल्सिअस यादरम्यान तापमान होते. विदर्भातही १२ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com