agriculture news in Marathi, Rain possibility from Tuesday , Maharashtra | Agrowon

जोर काहीसा ओसरला; मंगळवारपासून पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मध्य कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी येत आहेत. मंगळवारपासून (ता.१७) पावसासाठी पोषक हवामान होण्याचे संकेत असल्याने कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मध्य कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी येत आहेत. मंगळवारपासून (ता.१७) पावसासाठी पोषक हवामान होण्याचे संकेत असल्याने कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाब क्षेत्र मध्य भारतातील राज्यांमध्ये स्थिरावल्याने विदर्भ, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. विदर्भातील तळाशी गेलेल्या गोसीखुर्द, तोतलाडोह, उर्ध्व वर्धा धरणात चांगला पाणीसाठा झाला. या धरणातून पाण्याचा विसर्गही करावा लागला. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील धरणांमधून सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी, अधून-मधून येणाऱ्या सरींमुळे पाणलोटातून धरणांमध्ये पाण्याची आवकही सुरूच आहे. 

 मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरळ होत असून, मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सकरला आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर केरळ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने मंगळवारपासून दक्षिण आणि पूर्व भारतातील राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.  

शुक्रवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) :
कोकण : सांताक्रुझ ४१, मोखेडा ४३, भिरा ४४, कर्जत १०४, खालापूर ५७, माथेरान ९२, मुरूड ५८, पनवेल ४४, रोहा ४२, सुधागडपाली ४४, तळा ५०, चिपळूण ५३, लांजा ४२, संगमेश्वर ४७, अंबरनाथ ५६, भिवंडी ६५, कल्याण ५५, मुरबाड ११८, शहापूर ४०, ठाणे ७०, उल्हासनगर ६७.
मध्य महाराष्ट्र : पाथर्डी २५, श्रीरामपूर २७, भुसावळ ५०, बोधवड ४९, यावल ४५,गगणबावडा ४५, राधानगरी ३२, इगतपुरी ७८, महाबळेश्वर ६३. 
मराठवाडा : अर्धापूर २६, उमरी २६. 
विदर्भ : चांदूरबाजार ३५, चिखलदरा ७९, धारणी ३१, परतवाडा ३५, भामरागड ६५, एटापल्ली ३०, कोर्ची ३६, मुलचेरा ५१.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...