agriculture news in Marathi rain possibility in Vidarbha and Marathwada Maharashtra | Agrowon

विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पुढे गेला आहे.

पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पुढे गेला आहे. उन्हाचा चटका असह्य होत असतानाचा विदर्भ, मराठवाड्यात आजपासून (ता.३) पुर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. राज्यात वाढलेला उन्हाचा चटकाही कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मार्च महिन्याच्या अखेरीस राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पुर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या तापमानात चढ-उतार सुरू होता. मात्र दोन दिवसांपासून पुर्वमोसमी पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली. तापमान ३७ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत.

गुरूवारी (ता.२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे सलग दुसऱ्या दिवशी ४०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. तर सोलापूर येथे ३९.६ अंश, अकोला येथे ३९.५, अमरावती व वर्धा येथे ३९.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सांगली, परभणी, ब्रह्मपुरी, नागपूर येथेही तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. 

मराठवाड्यापासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. रविवारपर्यंत (ता. ५) विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

गुरूवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.७, जळगाव ३८.६, कोल्हापूर ३७.६, महाबळेश्‍वर ३०.७, मालेगाव ४०.४, नाशिक ३६.६, निफाड ३२.०, सांगली ३८.४, सातारा ३७.७, सोलापूर ३९.६, डहाणू ३१.९, सांताक्रूझ ३३.७, रत्नागिरी ३४.०, औरंगाबाद ३६.६, परभणी ३८.४, अकोला ३९.५, अमरावती ३९.०, बुलडाणा ३५.७, ब्रह्मपूरी ३८.५, गोंदिया ३७.२, नागपूर ३८.६, वर्धा ३९.०. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...