agriculture news in Marathi rain possibility in Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात वादळी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ असल्याने तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. या भागात गारपिटीची शक्यता कमी असून, साधारणपणे १५ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. 
- अनुपम कश्यपी, पुणे हवामान विभागाचे प्रमुख, हवामान विभाग, पुणे

पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे. यामुळे विदर्भातील तुरळक ठिकाणी आज (शुक्रवारी) आणि उद्या (शनिवारी) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि कोकणात हवामान काही अंशी ढगाळ राहणार आहे. रविवार (ता. १५) पासून पुन्हा हवामान कोरडे राहणार असून, थंडीत वाढ होणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

मध्य प्रदेशाच्या परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीठ होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम विदर्भातील काही भागात होत असून हवामान अंशत: ढगाळ आहे. यामुळे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, गोंदिया या भागातील थंडी काही प्रमाणात कमी झाली असून किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. गुरुवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे १३.२ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.   

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकण या भागातही हवामान अंशत: ढगाळ आहे. सकाळी दहानंतर उन पडत असले तरी अधूनमधून सावलीचाही खेळ सुरू आहे. पहाटेच्या गारवा कमी झाला आहे. या भागात किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही किंचित वाढ झाली आहे. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.

कोकणात २० ते २१ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात १५ ते १९ तर मराठवाड्यात १५ ते १६ अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान होते. 
गुरुवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः 
अकोला १६.० (३), अलिबाग २०.१ (१), अमरावती १६.२(१), औरंगाबाद १५.८ (४), बीड १८.६ (५), बुलढाणा १७.८ (३), चंद्रपूर १३.२ (-१), डहाणू २०.१ (१),  गोंदिया १४.६ (२), जळगाव १७.६ (६), कोल्हापूर १९.० (३), महाबळेश्वर १५.० (१), मालेगाव १८.४ (७), मुंबई २१.४ (३), नागपूर १४.४ (२), नांदेड १६.० (३), नाशिक १६.४ (६), निफाड १४.०, परभणी १६.२ (३), लोहगाव १८.३ (५), पाषाण १७.५ (६), पुणे १७.६ (६), रत्नागिरी २१.८ (१), सांगली १७.९ (३), सातारा १६.६ (३), सोलापूर १९.० (३), ठाणे २३.०, वर्धा १५.९ (२), यवतमाळ १७.० (२)


इतर अॅग्रो विशेष
रिक्त पदे तत्काळ भरारिक्त पदांमुळे कृषी विभागाच्या कामांचा बोजवारा...
आरोग्यमय जीवनासाठी फळे-भाज्यांचे सेवन...संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४...
मागील वर्ष ठरले आजवरचे सर्वाधिक उष्णपुणे : कोरोनाचे संकट, बर्ड फ्लूची साथ आणि शेतकरी...
शेतकरी पुत्राने बनवले वाहन ऊस भरणी यंत्रसातारा : सध्या ऊस हंगामातील सर्वात मोठी समस्या...
मध्य महाराष्ट्रात थंडी; निफाडला नीचांकी...पुणे : राज्यातील किमान तापमानात चढउतार होत आहे....
गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारेऔरंगाबाद जिल्ह्यातील नाचनवेल-कोपरवेल व आडगाव (...
तेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके मैं...लासूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील निवृत्त सैनिक...
जवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर...
लाल वादळ मुंबईत धडकले नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी...
शेतीपंप वीजबिले तपासली जाणार; चुकीची...कोल्हापूर : ‘‘राज्य सरकारने कृषिपंप वीजजोडणी धोरण...
राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरणपुणे : साखर कारखान्यांकडे लक्षावधी टन साखर पडून...
पूर्व विदर्भात गुरुवारी पावसाची शक्यतापुणे : मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
पशुसंवर्धन विभागात ३० टक्‍के पदे रिक्‍तनागपूर : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुर्दशेसोबतच...
दिल्लीतील ट्रॅक्‍टर परेडला हिरवा कंदील...नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले...
बारामतीत अवतरले ‘अॅग्रोवन मार्ट’बारामती, जि. पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची...
औरंगाबादेत होणार अंडीपुंजनिर्मिती केंद्रऔरंगाबाद : रेशीम शेती व उद्योगाला चालना...
गोंदियात किमान तापमान १० अंशांवरपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब उत्तर...
शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी...
केंद्राच्या स्पष्ट धोरणाअभावी ‘जीएम’...नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या...