विदर्भात पावसाची शक्यता

rain possibility
rain possibility

पुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत असल्याने पूर्व भारतातील छत्तीसगड, बिहार, झारखंडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोषक हवामान असल्याने विदर्भातही आजपासून (ता. २३) हलक्या पावसाचा अंदाज आहे. यातच उत्तरेकडून थंड वारे आल्याने उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.   राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. शनिवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहु संशोधन केंद्रात नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमान नोदले गेले. राज्याच्या कमाल व किमान तापमानात चढउतार सुरूच असून, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड येथे तापमान ३५ अंशांच्या आसपास आहे. बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.१(१६.७), नगर ३५.६ (१७.०), धुळे ३२.० (१३.४) जळगाव ३३.०(१५.६), कोल्हापूर ३३.२(२०.०), महाबळेश्‍वर २७.७(१८.०), मालेगाव ३५.२ (१७.०), नाशिक ३३.१(१५.०), निफाड ३१.०(११.४), सांगली ३५.०(१८.४), सातारा ३५.०(१९.७), सोलापूर ३५.०(१९.७), अलिबाग २९.९, डहाणू २९.९ (१९.८), सांताक्रूझ ३३.५(१९.१), रत्नागिरी ३४.०(२०.८), औरंगाबाद - (१८.१), परभणी ३४.५(१७.६), नांदेड ३५.५ (१४.०), अकोला ३४.५(१९.२०), अमरावती  ३३.०(१९.०), बुलडाणा ३२.०(१९.५), चंद्रपूर ३३.०(१८.२), गोंदिया २९.५(१३.२), नागपूर ३१.४(१८.२), वर्धा ३४.८(१९.५), यवतमाळ ३२.५(१९.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com