agriculture news in Marathi rain possibility in Vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

पुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी उघडीप देण्याची चिन्हे आहे. आजपासून (ता.३१) राज्याच्या बहुतांशी भागात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. मात्र विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उन्हाचा चटका वाढून राज्याच्या तापमानातही वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.   

राज्यात वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाने नुकसान केले आहे. गुरूवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, कोकणासह, मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी हवामान मुख्यत: कोरडे राहणार आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. 

सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी, अकोला, अमरावती येथे तापमान ३८ अंशांच्या पुढे होते. दक्षिण मध्य महाराष्ट्रात समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून अंतर्गत तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान होण्याची व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.८ (२०.१), जळगाव ३७.६ (२२.५), कोल्हापूर ३७.३ (२३.६), महाबळेश्‍वर ३०.७ (१९.४), मालेगाव ३६.४ (२१.४), नाशिक ३६.० (१९.५), निफाड ३५.० (१७.२), सांगली ३७.२(२३.८), सातारा ३७.३(२१.६), सोलापूर ३९.९ (२५.६), डहाणू ३०.२ (२३.०), सांताक्रूझ ३५.१ (२३.६), रत्नागिरी ३४.१ (२४.०), औरंगाबाद ३६.० (१९.९), परभणी ३९.० (२१.५), अकोला ३८.८(२०.०), अमरावती ३८.० (१९.२), बुलडाणा ३३.४ (२१.४), ब्रह्मपूरी ३७.८ (१९.२), चंद्रपूर ३७.५ (१९.०), गोंदिया ३४.८ (२१.०), नागपूर ३७.६ (२०.२), वर्धा ३७.८ (२०.४).


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
कमी पावसाच्या प्रदेशात रुजल्या...औरंगाबाद जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दौलताबाद...
शास्त्रीय तंत्राद्वारे वाढवली कांद्याची...अवर्षणग्रस्त येवला तालुक्यातील (जि. नाशिक)...
पडीक जमिनीत फुलवली साडेतीन हजार झाडांची...माहुळंगे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील अनिल...
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
दीडपट 'एमएसपी' म्हणजे निव्वळ धूळफेक :...पुणे: मोदी सरकारने खरिपासाठी जाहीर केलेल्या किमान...
टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या...
‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
मॉन्सून कर्नाटकात आज धडकणारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट...पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’...