विदर्भात हलक्या पावसाची शक्यता

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान काहीसे निवळले आहे. आज (ता.२२) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यात हवामान मुख्यत: उष्ण व कोरड्या राहणार आहे.
hawaman
hawaman

पुणे: पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान काहीसे निवळले आहे. आज (ता.२२) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यात हवामान मुख्यत: उष्ण व कोरड्या राहणार आहे. वादळी पाऊस थांबल्याने उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  पूर्वमोसमी पावसाचे ढग, वाहणारे वारे यामुळे दोन दिवस उन्हाचा चटका काहीसा कमी झाला होता. मात्र तापमानात पुन्हा हळूहळू वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीच्या वर सरकला आहे. मालेगावसह नांदेड, अकोला, वाशीम येथे कमाल तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे. आकाश निरभ्र झाल्याने उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि परीसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. आज (ता.२२) विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  मंगळवार (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.३, जळगाव ४१.०, धुळे ४१.४, कोल्हापूर ३५.८, महाबळेश्‍वर ३३.०, मालेगाव ४२.६, नाशिक ३८.१, निफाड ३६.४, सांगली ३८.१, सातारा ३९.६, सोलापूर ४०.०, डहाणू ३५.५, सांताक्रूझ ३७.८, रत्नागिरी ३५.३, औरंगाबाद ३९.५, परभणी ४२.०, नांदेड ४२.५, अकोला ४२.५, अमरावती ४१.०, बुलडाणा ३९.८, ब्रह्मपुरी ४०.८, चंद्रपूर ३८.५, गोंदिया ३८.८, नागपूर ४०.८, वाशीम ४२.२, वर्धा ४१.०.  नांदेडच्या बिलोली तालुक्यात पाऊस नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्याच्या चार मंडळामध्ये सोमवारी रात्री (ता.२०) हलका ते मध्यम पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पीकांचे नुकसान झाले. बिलोली मंडळात २७ मिलीमीटर, आदमपूर मंडळात ५ मिलीमीटर,सगरोळी मंडळात ५ मिलीमीटर, कुंडलवाडी मंडळात ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. वादळी वाऱ्यामुळे ज्वारीसह फळपिकांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com