विदर्भात अवकाळीची शक्यता 

दक्षिण आसामच्या परिसरात चक्रीय स्थिती तयार होत आहे. त्याचा परिणाम विदर्भाच्या काही भागावर होण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या विदर्भातील काही भागांत हवामान बदल होतील.
Hawaman
Hawaman

पुणे : दक्षिण आसामच्या परिसरात चक्रीय स्थिती तयार होत आहे. त्याचा परिणाम विदर्भाच्या काही भागावर होण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या विदर्भातील काही भागांत हवामान बदल होतील. येत्या बुधवार (ता. १०) पासून चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. 

गेल्या काही दिवसांपासून विदर्भाच्या अनेक भागांत उन्हाच्या झळा तीव्र होत असताना वातावरणात वेगाने बदल होत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही ऊन वाढू लागले असून, थंडीचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. रविवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात १२.२ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, जळगाव या भागांत थंडीने बर्यापैकी काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. थंडी कमी होत असून उन्हाचा पारा वाढू लागला आहे. 

सध्या राज्यातील ऊन वाढत असल्याने कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. विदर्भातील बुलडाणा येथे सरासरीच्या तुलनेत ४.८ अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान ३७.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ३९.४ अंश सेल्सिअसची नोद झाली आहे. तर अमरावती, बुलडाणा, वर्धा, गोंदिया, नागपूर, वाशीम या भागांत ३५ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते. मराठवाड्यातही सकाळपासून ऊन वाढू लागले आहे. त्यामुळे कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मालेगाव, जळगाव या भागांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. कोकणातील कमाल तापमानात चढ-उतार होत असून, हडाणू भागात कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे. 

रविवारी (ता.७) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रूझ) १९.८ (-१) 
  • ठाणे २२.२ 
  • अलिबाग २०.९ (१) 
  • रत्नागिरी २२.१ (१) 
  • डहाणू २०.१ 
  • पुणे १५.३ 
  • नगर १५.९ 
  • जळगाव १४.२ (-३) 
  • कोल्हापूर २१ (२) 
  • महाबळेश्‍वर १७.५ (१) 
  • मालेगाव १७.४ (३) 
  • नाशिक १५.६ (१) 
  • निफाड १२.२ 
  • सांगली २०.८ (३) 
  • सातारा १७.६ 
  • सोलापूर १९.९ (-१) 
  • औरंगाबाद १८.५ (१) 
  • बीड १८.३ 
  • परभणी १८.९ (१) 
  • परभणी कृषी विद्यापीठ १४.७ 
  • नांदेड १६ (-२) 
  • उस्मानाबाद १९.४ 
  • अकोला १८.८ (-१) 
  • अमरावती २०.५ (-१) 
  • बुलडाणा २०.२ (१) 
  • चंद्रपूर १७.४ (-३) 
  • गोंदिया १५.५ (-३) 
  • नागपूर १६.१ (-३) 
  • वर्धा १६.६ (-२) 
  • यवतमाळ २१ (२)   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com