विदर्भात पावसाची शक्यता 

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही भागांत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहे.
Hawaman
Hawaman

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही भागांत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहे. पुढील काही दिवस ही स्थिती अशीच राहणार आहे. कोकण, मराठवाड्याच्या काही भागांत हवामान कोरडे राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग व विदर्भाच्या काही भागांत पूर्वमोसमीच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. 

गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती होती. यामुळे राज्यात ढगाळ वातावरणासह उन्हाचा होता. शनिवारी सकाळी काही अंशी ढगाळ वातावरण होते. मात्र दहा वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निवळून उन्हाचा झळा तीव्र झाल्या होत्या. दुपारी कमाल तापमानाचा पारा कमालीचा वाढला होता.  दुपारनंतर काहीसा उन्हाचा चटका जाणवत होता. चार वाजल्यानंतर पारा काही प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे शनिवारी (ता. ८) सकाळी चोवीस तासांत खानदेशातील जळगाव येथे सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. पुढील काही दिवस कमाल तापमानात चढ-उतार राहणार आहे.  दोन दिवसांपासून उत्तर कर्नाटक व परिसर ते दक्षिण केरळ व किनारपट्टीदरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीय वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. मध्य प्रदेश ते विदर्भाचा पश्‍चिम भागापर्यंत चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. तसेच गुजरात किनारपट्टी व अरबी समुद्राचा वायव्य भागापर्यंत चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. तर पूर्व-पश्‍चिम असलेल्या मध्य प्रदेश ते त्रिपुरा, झारखंड, पश्‍चिम बंगाल दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यातील भूपृष्टावर बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे.  राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस  रविवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण विदर्भ  सोमवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण विदर्भ  मंगळवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण विदर्भ  बुधवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण विदर्भ  शनिवारी (ता.८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३४.५ 
  • अलिबाग ३४.५ 
  • रत्नागिरी ३५ 
  • डहाणू ३५.८ 
  • पुणे ३७ 
  • जळगाव ४१.३ 
  • कोल्हापूर ३५.५ 
  • महाबळेश्वर ३०.१ 
  • मालेगाव ४०.४ 
  • नाशिक ३८ 
  • सांगली ३६.५ 
  • सातारा ३५.६ 
  • सोलापूर ३८.२ 
  • औरंगाबाद ३७.३ 
  • बीड ३६ 
  • अकोला ४०.८ 
  • अमरावती ४० 
  • बुलडाणा ३८.४ 
  • ब्रम्हपुरी ४० 
  • गोंदिया ३८ 
  • नागपूर ३८.५ 
  • वर्धा ३९.५ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com