agriculture news in Marathi rain possibility in vidarbha Maharashtra | Agrowon

विदर्भात पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 मे 2021

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही भागांत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहे. 

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही भागांत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहे. पुढील काही दिवस ही स्थिती अशीच राहणार आहे. कोकण, मराठवाड्याच्या काही भागांत हवामान कोरडे राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग व विदर्भाच्या काही भागांत पूर्वमोसमीच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. 

गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती होती. यामुळे राज्यात ढगाळ वातावरणासह उन्हाचा होता. शनिवारी सकाळी काही अंशी ढगाळ वातावरण होते. मात्र दहा वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निवळून उन्हाचा झळा तीव्र झाल्या होत्या. दुपारी कमाल तापमानाचा पारा कमालीचा वाढला होता. 

दुपारनंतर काहीसा उन्हाचा चटका जाणवत होता. चार वाजल्यानंतर पारा काही प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे शनिवारी (ता. ८) सकाळी चोवीस तासांत खानदेशातील जळगाव येथे सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. पुढील काही दिवस कमाल तापमानात चढ-उतार राहणार आहे. 

दोन दिवसांपासून उत्तर कर्नाटक व परिसर ते दक्षिण केरळ व किनारपट्टीदरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीय वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. मध्य प्रदेश ते विदर्भाचा पश्‍चिम भागापर्यंत चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. तसेच गुजरात किनारपट्टी व अरबी समुद्राचा वायव्य भागापर्यंत चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. तर पूर्व-पश्‍चिम असलेल्या मध्य प्रदेश ते त्रिपुरा, झारखंड, पश्‍चिम बंगाल दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यातील भूपृष्टावर बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस 
रविवार ः
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण विदर्भ 
सोमवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण विदर्भ 
मंगळवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण विदर्भ 
बुधवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण विदर्भ 

शनिवारी (ता.८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

 • मुंबई (सांताक्रूझ) ३४.५ 
 • अलिबाग ३४.५ 
 • रत्नागिरी ३५ 
 • डहाणू ३५.८ 
 • पुणे ३७ 
 • जळगाव ४१.३ 
 • कोल्हापूर ३५.५ 
 • महाबळेश्वर ३०.१ 
 • मालेगाव ४०.४ 
 • नाशिक ३८ 
 • सांगली ३६.५ 
 • सातारा ३५.६ 
 • सोलापूर ३८.२ 
 • औरंगाबाद ३७.३ 
 • बीड ३६ 
 • अकोला ४०.८ 
 • अमरावती ४० 
 • बुलडाणा ३८.४ 
 • ब्रम्हपुरी ४० 
 • गोंदिया ३८ 
 • नागपूर ३८.५ 
 • वर्धा ३९.५ 

इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...