विदर्भात पावसाचा अंदाज 

गुजरातच्या किनारपट्टीकडे चक्रीवादळ सरकत असताना पश्चिम महाराष्ट्रात वेगाने वारे वाहत होते. मात्र, आज या वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला आहे. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक पडल्या.
Hawaman
Hawaman

पुणे : गुजरातच्या किनारपट्टीकडे चक्रीवादळ सरकत असताना पश्चिम महाराष्ट्रात वेगाने वारे वाहत होते. मात्र, आज या वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला आहे. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक पडल्या. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मराठवाडा व विदर्भात काही प्रमाणात चटका आहे. आज (ता.१८) विदर्भात पावसाचा अंदाज असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.  

अरबी समुद्रात चक्रिवादळाच्या वाढलेल्या अतितिव्रतेमुळे वाऱ्याचा प्रभाव जवळपास पश्चिम महाराष्ट्रावर आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. सर्व भागांत ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा पारा खाली आला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत दहा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान कमी झाले आहे. सांगलीत सरासरीच्या तुलनेत दहा अंश सेल्सिअसने घट होऊन कमाल तापमान २६.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. तर कोल्हापूर, महाबळेश्वर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातही सरासरीच्या तुलनेत तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे उकाडा कमी झाला आहे. 

मराठवाडा व विदर्भात उन्हाच्या झळा अजूनही कायम आहे. चक्रिवादळामुळे राज्यातील कमाल तापमानात चढउतार झाले आहे. मराठवाडा व विदर्भात पारा अजूनही ४० अंश सेल्सिअसच्यावर आहे. अकोला, ब्रम्हपुरी, गोंदिया, खानदेशातील जळगाव जिल्हे वगळता उर्वरित सर्वच भागांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. त्यातच नाशिक, पुणे, नगर, औरंगाबाद, परभणी, सातारा या भागात होत असलेल्या पावसामुळे वातावरण काही प्रमाणात थंड  झाले आहे. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस  मंगळवार ः अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, उर्वरित भागात ढगाळ वातावरण  बुधवार ः मुंबई, नगर, औरंगाबाद, जालना जिल्हे वगळता सर्व जिल्हयात ढगाळ वातावरण  गुरूवारः दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग  शुक्रवारः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, पुणे, कोल्हापूर,  सोमवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासात विविध शहरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३६.० 
  • अलिबाग ३५.३ 
  • रत्नागिरी २९.२ 
  • डहाणू ३४.५ 
  • पुणे ३०.२ 
  • जळगाव ४०.२ 
  • कोल्हापूर २५.५ 
  • महाबळेश्वर २०.६ 
  • नाशिक ३५.१ 
  • सांगली ३६.९ 
  • सातारा २७.७ 
  • सोलापूर ३२.४ 
  • औरंगाबाद ३४.९ 
  • परभणी ३६.६ 
  • उस्मानाबाद ३५.२ 
  • बीड ३७.३ 
  • अकोला ४०.१ 
  • अमरावती ३८.६ 
  • बुलडाणा ३७.६ 
  • ब्रम्हपुरी ४२.७ 
  • चंद्रपूर ३९.८ 
  • गोंदिया ४०.२ 
  • नागपूर ३९.० 
  • वर्धा ३८.८ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com