मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज पावसाची शक्यता

पुणे  ः ओडिशा ते रायलसीमा परिसर आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे. तसेच दक्षिण गुजरातच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. त्यामुळे आज (ता. १०) आणि उद्या (ता. ११) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.     विदर्भात उष्णतेची लाट असल्याने अनेक ठिकाणी उष्णतेने कहर केला आहे. त्यामुळे चार ते पाच दिवसांपासून तापमानाचा उच्चांक नोंदवला जात आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे गुरुवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.  आजही विदर्भात काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असून, कमाल तापमानाचा पारा चढलेलाच असेल. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत उष्णता कायम राहील. विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर येथील पारा ४५ अंशांच्या दरम्यान होता. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत्या. मराठवाड्यातील नांदेड, बीड, परभणी येथील तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्र आणि कोकणचे तापमान सरासरीपर्यंत खाली आले होते. या भागातील तापमान सध्या ३३ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. त्यामुळे उन्हाच्या झळा काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. येत्या दोन ते तीन दिवस या भागात आकाश अंशतः ढगाळ राहील. यामुळे कमाल तापमानाचा पारा हा सरासरीएवढाच राहण्याची शक्यता आहे.  गुरुवारी (ता. ९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३५.८ (-१.९), जळगाव ४२.१ (-१.०), कोल्हापूर ३५.३ (-१.३), महाबळेश्‍वर ३०.१ (-१.२), मालेगाव ४०.६ (०.३), नाशिक ३५.० (-३.२), सांगली ३७.२ (-१.०), सातारा ३६.२ (-०.८), सोलापूर ४१.१ (०.३), मुंबई ३३.८ (०.५), अलिबाग ३३.५ (०.९), रत्नागिरी ३३.५ (०.९), डहाणू ३४.१ (०.३), बीड ४४.१ (३.८), नांदेड ४३.०(१.३), परभणी ४४.० (२.१), अकोला ४३.१ (०.८), अमरावती ४३.६ (१.१), बुलडाणा ३९.३ (०.७), ब्रह्मपुरी ४५.९ (३.८), चंद्रपूर ४५.८ (३.८), गोंदिया ४३.० (१.०), नागपूर ४५.० (२.८), वर्धा ४५.० (२.२), वाशिम ४३.४, यवतमाळ ४३.५ (१.८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com