विदर्भात उद्यापासून पाऊस शक्य 

विदर्भाच्या काही भागांत वातावरणात बदल होण्यास सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे.
Hawaman
Hawaman

पुणे : विदर्भाच्या काही भागांत वातावरणात बदल होण्यास सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. उद्यापासून (ता.१०) पुढील तीन ते चार दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अवकाळीच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. 

उत्तर भारतात राजस्थानच्या उत्तर पश्चिम भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच मेघालय व परिसरातही चक्रिय वाऱ्याची स्थिती असून ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे उत्तर भारतातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. त्याचबरोबर पंजाब, हरियाना, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, अरुणाचलप्रदेश, पश्चिम बंगाल या भागांत पाऊस पडत आहे. त्याचा काही अंशी परिणाम विदर्भाच्या व उर्वरित महाराष्ट्राच्या काही भागावर होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भात कमी अधिक स्वरूपात थंडी आहे. कोकण व मराठवाडा भागात थंडी कमी झाली आहे. सोमवारी (ता.८) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्या आवारात ११.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा हा जवळपास आहे. काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे.  सध्या राज्यातील अनेक भागांत थंडीचा प्रभाव कमी होऊ लागला असून उन्हाचा पारा वाढू लागला आहे. थंडी कमी होत असून उन्हाचा पारा वाढू लागला आहे. विदर्भातील सर्वच भागांत उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. सोमवारी (ता.८) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील ब्रम्हपुरी येथे सरासरीच्या तुलनेत ५.३ अंश सेल्सिअसने वाढ होऊन सर्वाधिक कमाल तापमान ४०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर चंद्रपूर येथेही ४०.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. तर अमरावती, बुलडाणा, वर्धा गोंदिया, नागपूर, वाशीम या भागात ३६ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते. मराठवाड्यातही कमाल तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर मालेगाव, जळगाव या भागात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. कोकणात उन्हाच्या झळा वाढत आहे. त्यामुळे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली असून कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. 

सोमवारी (ता.८) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रुझ) १९.२ (-१) 
  • ठाणे २१.८ 
  • अलिबाग २०.५ 
  • रत्नागिरी २०.१ (-१) 
  • डहाणू १९.५ (-१) 
  • पुणे १४.९ 
  • नगर १५.९ 
  • जळगाव १८.० (१) 
  • कोल्हापूर २१.० (२) 
  • महाबळेश्वर १७.५ (१) 
  • मालेगाव १७.६ (२) 
  • नाशिक १४.२ (-१) 
  • निफाड ११.५ 
  • सांगली २०.० (२) 
  • सातारा १७.५ 
  • सोलापूर १९.९ (-१) 
  • औरंगाबाद १९.६ (२) 
  • बीड १८.३ 
  • परभणी १९.६ 
  • परभणी कृषी विद्यापीठ १६.७ 
  • नांदेड १५.५ (-२) 
  • उस्मानाबाद १९.० 
  • अकोला १९.२ 
  • अमरावती १९.३ (-१) 
  • बुलडाणा २२.५ (३) 
  • चंद्रपूर १९.८ (-१) 
  • गोंदिया १५.० (-४) 
  • नागपूर १८.४ (-१) 
  • वर्धा १९.५ (-१) 
  • यवतमाळ २१.५ (१) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com