agriculture news in Marathi rain possibility in west Vidarbha Maharashtra | Agrowon

पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

पुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात आज (ता. २४) हलक्या सरींची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

पुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात आज (ता. २४) हलक्या सरींची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

रविवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस, तर निफाड येथील गहूसंशोधन केंद्रात नीचांकी १२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगरसह सांताक्रुझ आणि अकोला येथे तापमान ३६ अंशांच्या पुढे आहे. अनेक ठिकाणी किमाल तापमान ३४ अशांपेक्षा अधिक असून, उन्हाचा चटका असह्य होत आहे. किमान तापमानाचा पाराही १७ अंशांच्या पुढे गेल्याने थंडी कमी झाली आहे.  

मध्य महाराष्ट्र ते मध्य प्रदेशादरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा उत्तर कोकणापासून बिहारपर्यंत विस्तारला आहे. पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम, बंगालच्या उपसागरावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा, यामुळे पूर्व भारतात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. उद्या (ता. २४) विदर्भात ढगाळ हवामानाची शक्यता आहे. तर, पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहण्याची शक्यता वर्तविली आहे.  

रविवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.४ (१५.९), नगर ३६.८ , धुळे ३३.६ (१३.४), जळगाव ३४.६ (१८.०), कोल्हापूर ३३.५ (१९.६), महाबळेश्‍वर २९.५(१८.०), मालेगाव ३४.४ (१७.८), नाशिक ३४.०(१५.९), निफाड ३१.२(१२.३), सांगली ३५.२(१८.०), सातारा ३४.६(१६.९), सोलापूर ३५.८(२०.५), डहाणू ३०.१ (२२.४), सांताक्रुझ ३६.६(१९.६), रत्नागिरी ३५.९(२०.५), औरंगाबाद ३३.४(१७.५), परभणी ३४.७(१७.४), नांदेड ३५.० (१४.५), अकोला ३६.१ (१९.२), अमरावती  ३४.६ (१९.२), बुलडाणा ३३.७ (१९.५), चंद्रपूर ३४.० (१८.४), गोंदिया ३१.० (१५.२), नागपूर ३३.२ (१७.६), वर्धा ३४.० (१९.४), यवतमाळ ३२.५ (१९.४).


इतर अॅग्रो विशेष
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...