Agriculture news in Marathi The rain is pouring down again | Page 2 ||| Agrowon

वाशीम जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरावी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

विकासकामांनाही खीळ बसली. ही सर्व पदे एक महिन्याच्या आत भरावी, अन्यथा ५२ सदस्यांसह उपोषणाला बसू असा इशारा वाशीम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन दिले आहे.

वाशीम ः जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त आहेत. याचा कामकाजावर परिणाम होत आहे. इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून नागरिकांची कामे खोळंबली आहेत. विकासकामांनाही खीळ बसली. ही सर्व पदे एक महिन्याच्या आत भरावी, अन्यथा ५२ सदस्यांसह उपोषणाला बसू असा इशारा वाशीम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन दिले आहे.

याबाबत ठाकरे यांनी म्हटले की, ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी जनकल्याणाची कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली जातात. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे बघितले जाते. परंतु येथील जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), वित्त विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी, लेखा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, उपअभियंता यांत्रिकी, सहायक भुवैज्ञानिक, कनिष्ठ भुवैज्ञानिक, जलसंधारण विभागातील जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपजिल्हा जलसंधारण अधिकारी, चार उपविभागीय जलसंधारण अधिकारी, आरोग्य विभागातील वर्ग एकची ७ पदे रिक्त आहेत.

कृषी विभागातील वर्ग दोनची २ पदे रिक्त आहेत. पशुसंवर्धन विभागातील वर्ग दोनची ८ पदे रिक्त आहेत. शालेय शिक्षण विभाग प्राथमिक येथे वर्ग दोनची १४ पदे रिक्त आहेत. समाजकल्याण विभागातील वर्ग एकची २ पदे आहेत. जिल्ह्यात एकूण वर्ग एक व वर्ग दोनची ६४ पदे रिक्त आहेत. यामुळे कामकाज प्रभावित झाले आहे. जिल्ह्यात पंचायत समिती स्तरावर वाशीम, मानोरा, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर येथील गटविकास अधिकारी वर्ग एकची ५ पदे रिक्त आहेत.


इतर ताज्या घडामोडी
परभणी विभागात रब्बीत ४ हजार हेक्टरवर...परभणी : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
अधिक उत्पादनासाठी गहू लागवड तंत्रज्ञानमहाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १७६१ किलो...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...