मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

आज (शुक्रवारी) खानदेशातील धुळे, नंदुरबार व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्हयात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला.
मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

पुणे : राज्यातील काही भागात पावसासाठी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडेल. आज (शुक्रवारी) खानदेशातील धुळे, नंदुरबार व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्हयात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला.

अरबी समुद्र, दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या शनिवारी आणि रविवारी कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे. तर अनेक भागात कडक ऊन पडून उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसापासून राज्यात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे कोकणातील मालवण येथे मध्यम पाऊस पडला असला तरी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. अनेक भागात पावसाची उघडीप असल्याने शेतीकामे वेगाने सुरू झाली आहेत. मध्य महाराष्ट्रातही आटपाडी येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. मराठवाड्यातही पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यामुळे वेगाने सुरू झालेली शेतीकामे खोळंबली आहेत. माजलगाव, मुदखेड, सोनपेठ, गंगाखेड येथे पावसाच्या जोरदार सरी पडल्या. विदर्भातही पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने तूर, कापूस पिकांना दिलासा मिळाला. गुरुवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत, हवामान विभाग)

  • कोकण : अलिबाग ५.२, चिपळूण ५, दोडामार्ग २, कणकवली ६, कणकवली ७, कुडाळ १४, मालवण ३५, सावंतवाडी ४,
  • मध्य महाराष्ट्र : अकोले १४, श्रीगोंदा ५१, रावेर ५, यावल ७.२, आजरा ४, शिरोळ ४५ ,मुल्हेर ११.२, बारामती ७.८, इंदापूर १.४, आटपाडी ८०, जत २७,कवठेमहांकाळ २०, मिरज १०, पलुस २२, विटा २७, दहीवडी ४०, कोरेगाव ६३, माळशिरस २६, मंगळवेढा ७.५, सांगोला २०,
  • मराठवाडा : माजलगाव ४५, औंढा नागनाथ १३, बिलोली २०, देगलूर ४३, किनवट १३, माहूर ११, मुदखेड ३९, नायगाव खैरगाव ९, उमरी ५, लोहारा ३, उमरगा ४, गंगाखेड २०, परभणी ६.६, सोनपेठ ३४,
  • विदर्भ : अमरावती २.६, परतवाडा ५.१, खामगाव ११.५, लोणार ४.४, नांदुरा ५.३, शेगाव १४.९, सिंदखेड राजा ३.९ जेवती १७.८, महागाव १३.९,
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com