agriculture news in marathi Rain prediction in central maharashtra by IMD | Agrowon

मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

आज (शुक्रवारी) खानदेशातील धुळे, नंदुरबार व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्हयात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला.

पुणे : राज्यातील काही भागात पावसासाठी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडेल. आज (शुक्रवारी) खानदेशातील धुळे, नंदुरबार व मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्हयात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला.

अरबी समुद्र, दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या शनिवारी आणि रविवारी कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे. तर अनेक भागात कडक ऊन पडून उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसापासून राज्यात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे कोकणातील मालवण येथे मध्यम पाऊस पडला असला तरी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. अनेक भागात पावसाची उघडीप असल्याने शेतीकामे वेगाने सुरू झाली आहेत. मध्य महाराष्ट्रातही आटपाडी येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. मराठवाड्यातही पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यामुळे वेगाने सुरू झालेली शेतीकामे खोळंबली आहेत. माजलगाव, मुदखेड, सोनपेठ, गंगाखेड येथे पावसाच्या जोरदार सरी पडल्या. विदर्भातही पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने तूर, कापूस पिकांना दिलासा मिळाला.

गुरुवारी (ता.१) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्रोत, हवामान विभाग)

  • कोकण : अलिबाग ५.२, चिपळूण ५, दोडामार्ग २, कणकवली ६, कणकवली ७, कुडाळ १४, मालवण ३५, सावंतवाडी ४,
  • मध्य महाराष्ट्र : अकोले १४, श्रीगोंदा ५१, रावेर ५, यावल ७.२, आजरा ४, शिरोळ ४५ ,मुल्हेर ११.२, बारामती ७.८, इंदापूर १.४, आटपाडी ८०, जत २७,कवठेमहांकाळ २०, मिरज १०, पलुस २२, विटा २७, दहीवडी ४०, कोरेगाव ६३, माळशिरस २६, मंगळवेढा ७.५, सांगोला २०,
  • मराठवाडा : माजलगाव ४५, औंढा नागनाथ १३, बिलोली २०, देगलूर ४३, किनवट १३, माहूर ११, मुदखेड ३९, नायगाव खैरगाव ९, उमरी ५, लोहारा ३, उमरगा ४, गंगाखेड २०, परभणी ६.६, सोनपेठ ३४,
  • विदर्भ : अमरावती २.६, परतवाडा ५.१, खामगाव ११.५, लोणार ४.४, नांदुरा ५.३, शेगाव १४.९, सिंदखेड राजा ३.९ जेवती १७.८, महागाव १३.९,

इतर बातम्या
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
शेतकऱ्यांनी केळी पीकविमा भरू नयेजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
सांगलीत रब्बीचा ३९ हजार हेक्टरवर पेरासांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी...
मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी १७३४...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील पिकांच्या नुकसान...
अमरावतीमधील तीन लाख हेक्‍टरसाठी २१४...अमरावती : संततधार पाऊस, ढगाळ वातावरण, कीडरोगाचा...
रत्नागिरीतील पीक नुकसानीची भरपाई मिळेल...चिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यात मागील...
शितादही करण्यापुरताही कापूस लागला नाहीअकोला ः शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली. कपाशीची...
परभणी जिल्ह्यात पीकविमा परताव्यासाठी ३१...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
कुक्कुटपालन चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय...औरंगाबाद : ‘‘कुक्कुटपालनासाठी जागा, खाद्य,...
सीताफळ प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन...अकोला ः गेल्या काही वर्षात सीताफळ लागवडीकडे...
नगरमधील ६० गावांतील ७८ पाणी नमुने दूषितनगर ः जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील सप्टेंबर...
पुणे कृषी महाविद्यालयात आंदोलनपुणे ः सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महात्मा...
गोंदिया जिल्ह्यातील दोन संस्थांचा धान...गोंदिया : नियमबाह्यरीत्या धान खरेदी तसेच...
हिंगोली जिल्ह्यात तीन लाख ७ हजार...हिंगोली : जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे...
उत्पादन खर्चाच्या दुप्पट दराचे काय? ः...नाशिक : ‘‘केंद्र सरकारने कांदा...
सोलापूर जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्‍टर...सोलापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात...
सोलापुरात महावितरण मुख्यालयाला ‘...सोलापूर : लॉकडाऊन काळातील शेतीचे संपूर्ण वीज बिल...
सोलापूर जिल्ह्यात तीस हजार शेतीपंपाच्या...सोलापूर :  अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...