agriculture news in marathi Rain Prediction Central Maharashtra, Marathawada | Page 2 ||| Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

गेल्या काही दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात ढगाळ स्थिती आहे.

पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात ढगाळ स्थिती आहे. यामुळे आज (ता.३०) धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

उत्तर भारतातून परतीचा पाऊस सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सकाळ पासून उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील ब्रम्हपुरी येथे ३४.८ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर पुण्यातही उन्हाचा पारा वाढत असून उकाड्यात वाढ होत असल्याची स्थिती आहे. पुण्यात जवळपास ३०.८ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर पावसाने उघडिपीनंतर हवेत गारवा असल्याने किमान तापमानात काहीशी घट होऊ लागली आहे. महाबळेश्वर येथे १५.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.

सध्या राज्यात पाऊस थांबला आहे. त्यामुळे शेतीकामांनीही चांगलाच वेग घेतला असला तरी मराठवाडा व मध्य महाराष्ट्र, कोकणात वाफसा नसल्याने अजूनही शेतीकामे खोळंबल्याची स्थिती आहे. मंगळवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. तर मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, तळोदा, लोणावळा, कवठेमहांकाळ येथे तुरळक सरी बरसल्या. मराठवाड्यात पूर्णतःही ऊन पडल्याने शेतातील वाफसा कमी होऊ लागला आहे. पश्चिम विदर्भात पाऊस नसला तरी पूर्व भागात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या.

मंगळवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग)

  • कोकण : माथेरान ३, म्हसळा २, चिपळून ६, मंडणगड ३, कणकवली ७, अंबरनाथ ६.८, भिवंडी १, ठाणे १,
  • मध्य महाराष्ट्र : गगणबावडा २, तळोदा १, लोणावळा कृषी ४, कवठेमहांकाळ १.२,
  • विदर्भ : चांदूर रेल्वे ६.७, धामणगाव रेल्वे ३.९, तिवसा १०, तुमसर २, खामगाव २.१, भद्रावती २.३, जेवती ३.१, राजूरा ३.६, कुरखेडा १.८, हिंगणा १५.३, कामठी २.५, काटोल ५.६, नागपूर २४, रामटेक ४, 

इतर अॅग्रो विशेष
जोरदार पावसाचा अंदाज पुणे ः राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...
बिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ची उलाढाल...नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (ता. नेवासा) येथील...
पाऊस ओसरला; शेतीकामांत अडथळे पुणे ः गेल्या दोन दिवसांत पावसाने काहीशी...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २...कोल्हापूर: ‘स्वाभिमानी’ची यंदाची व १९ वी ऊस परिषद...
ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत द्या...मुंबई: परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम...
बढत्या देताना गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष पुणे: राज्याच्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना...
उन्हाळ कांद्याची आवक घटली; दरात सुधारणा नाशिक: उन्हाळ कांद्याच्या मागील वर्षी मोठ्या...
`विकेल ते पिकेल’ संकल्पनेत भरिताची...जळगाव ः ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेत जिल्ह्यात...
‘जॉईंट ॲग्रेस्को’ ऑनलाइन होणार अकोला ः खरीप हंगामापूर्वी होणारी राज्यातील चार...
किसान रेल्वेने शेतमाल वाहतुकीवर ५०...नागपूर ः किसान रेल्वेच्या माध्यमातून...
मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार ...मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा...
जोरदार पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात...
पूरक व्यवसायातून स्वयंपूर्णतेचा धडादुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि परसबागेतील...
डोळ्यातल्या पाण्याचे मोलऑ क्टोबरचा दुसरा पंधरवाडा चालू आहे. मूग, उडीद,...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो हेक्टर...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा...
मराठवाड्यातील पाऊस ओसरला, नुकसानीचे...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे गतीने करा ः...मुंबई: अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान...
हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्हानिहाय...परभणी ः राज्यात हंगाम सन २०२०-२१ मध्ये किंमत...